काँग्रेसप्रणित Telangana मध्ये हिंदू सणासाठी ‘तुष्टीकरणाचे फरमान’; होळी साजरी करण्यावर लादली बंधने

62
काँग्रेसप्रणित Telangana मध्ये हिंदू सणासाठी 'तुष्टीकरणाचे फरमान'; होळी साजरी करण्यावर लादली बंधने
काँग्रेसप्रणित Telangana मध्ये हिंदू सणासाठी 'तुष्टीकरणाचे फरमान'; होळी साजरी करण्यावर लादली बंधने

होळी (Holi) खेळण्याबाबत हैदराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. आनंद (C. V. Anand) यांनी जारी केलेल्या नोटीसवरून काँग्रेसशासित तेलंगणामध्ये वाद निर्माण झाला आहे. (Telangana) होळी साजरी करणाऱ्या हिंदूंनी (Hindu) ‘इच्छुक नसणाऱ्या व्यक्तींवर, ठिकाणी आणि वाहनांवर’ रंग फेकू नये, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत, या आदेशात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी गटाने दुचाकी आणि इतर वाहने चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Telangana)

पोलिस आयुक्तांनी दि. ११ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, “हैदराबाद (Hyderabad) शहरातील सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी ‘इच्छुक नसणाऱ्या व्यक्तींवर, ठिकाणी आणि वाहनांवर’ रंगीत गुलाल किंवा रंगीत पाणी फेकल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी दुचाकी आणि इतर वाहनांच्या गटाच्या वाहतुकीवर बंदी घाला, असेही सूचनेत म्हटले आहे. (Telangana)

या सूचनेत पुढे म्हटले आहे की, “यामुळे शांतता भंग होण्याची आणि जनतेला गैरसोय किंवा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. होळी महोत्सव-२०२५ साजरा करण्याबाबतचा हा आदेश दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील. नोटीसनुसार, या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर हैदराबाद शहर पोलिस कायदा १३४८ फसलीच्या कलम ७६ अंतर्गत कारवाई केली जाईल. (Telangana)

हैदराबाद शहर पोलीस कायदा १३४८ फसलीच्या कलम ७६ मध्ये असे म्हटले आहे की जो कोणी हैदराबाद (Hyderabad) शहर पोलीस (Hyderabad City Police) आयुक्तांनी जारी केलेल्या कोणत्याही निर्देशांचे उल्लंघन करेल किंवा त्यांचे पालन करण्यास नकार देईल. त्याला ५० रुपये दंड किंवा ८ दिवसांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कायद्यात एक महिन्यापर्यंत कारावास किंवा १०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. (Telangana)

दरम्यान, सायबराबादचे पोलिस आयुक्त अविनाश मोहंती (Avinash Mohanty) यांनीही अशीच एक नोटीस जारी केली आहे. त्यात हिंदूंना (Hindu) अनोळखी व्यक्तींवर, ठिकाणांवर आणि वाहनांवर रंग किंवा पाणी फेकण्याविरुद्ध आणि समूहाने वाहने चालवण्याविरुद्ध ‘चेतावणी’ देण्यात आली. भाजपाने या सूचनांवर टीका केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर हिंदूंशी (Hindu) भेदभाव केल्याचा आरोप आहे. भाजपच्या (BJP) तेलंगणा युनिटने सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, “ईद साजरी करण्यावर कोणताही बंधने लादण्यात आली नाही, मग असा भेदभाव का?” असा सवाल तेलंगणा भाजपाने विचारले आहे. (Telangana)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.