महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘एक हैं तो सैफ हैं’ या घोषणेचे समर्थन केले आहे. शिंदे यांनी अजित पवारांबाबतही (Ajit Pawar) मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवारांबाबत शिंदे म्हणाले की, ते महाआघाडीत कमकुवत दुवा ठरणार नाहीत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) आव्हानही दिले आहे. (Eknath Shinde)
मुख्यमंत्री शिंदेंनी राहुल गांधींना दिले आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका जाहीर सभेत राहुल गांधींना (Rahul Gandhi) आव्हान दिले होते आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना हिंदुहृदयसम्राट म्हणावे, असे म्हटले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार करत राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून दाखवावं, असं आव्हान दिले आहे. तसेच आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे खरे सैनिक आहोत. असे विधान ही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
(हेही पाहा – NCP Advertisement: राष्ट्रवादीच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; ठराविक भाग काढण्याचे दिले आदेश)
एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव यांना जंगलात जाऊन वन्यजीव छायाचित्रण करायला सांगितले असते. शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाची माळ काँग्रेसच्या गळ्यात बांधली गेली. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांची बदनामी केली, त्यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली. तसेच उद्धव ठाकरे हे केवळ स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसमध्ये दाखल झाले. आपल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असे उद्धव ठाकरेंना वाटत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community