काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. राहुल गांधी याना समन्स मिळाल्यापासून ते काही दिवस परदेशात होते, भारतात परतल्यावर त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याविषयी दिल्लीत बॅनरबाजी केली. या घटनाक्रमातही काँग्रेसवाल्यानी वीर सावरकर यांच्याप्रती असलेला द्वेष दाखवून दिला आहे. वीर सावरकर यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना ब्रिटिशांना दिलेल्या आवेदनाचा राहुल गांधी यांनी याआधीही वारंवार उल्लेख करत त्यांच्यावर अवमानकारक टीकाटिपण्णी केली आहे. आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही हाच कित्ता गिरवला आहे. राहुल गांधी आणि वीर सावरकर यांची तुलना करून काँग्रेसने स्वतःचे हसे केले आहे, अशी प्रतिक्रिया समाजात उमटू लागली आहे.
राहुल गांधी हे बिनडोक आहेत. ईडीला माफी मागून सुटता येत नाही. ईडीच्या कारवाईला सामोरे जा. वीर सावरकर यांनी कधीच माफी मागितली नाही. पण राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित नेहरू याना अवघे दोन दिवस तुरुंगात टाकल्यावर त्यांनी त्वरित माफी मागून पंकले झाले हा काँग्रेसचा इतिहास आहे त्यामुळे माफीवीर कोणी असेल तर ते पंडित नेहरू आहेत.
– अतुल भातखळकर, आमदार, भाजप
(हेही वाचा मानवी मृतदेहापासून बनवली गेली औषधे! माहिती वाचून व्हाल थक्क)
काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्लीत निदर्शने केली. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काँग्रेस मुख्यालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काहीही अभ्यास नसताना आपली तुलना कोणाशी करतोय याचे भान नसलेला हा नेता आहे. सातत्याने राजकीय अपयश पदरात येत असूनही एका स्वातंत्र्यवीराचा अपमान करण्याचे धारिष्ट्य दाखवणे यातच याची बुद्धी दिसून येते! आणि म्हणे ५३ वर्षांचा युवा (?) नेता! राजकीय जाण काडीचीही नाही आणि इतिहासाचा अभ्यास नाही! अंदमानात याने फक्त दोन दिवस राहून दाखवावे! त्याला सत्य सांगण्याची एकाही काँगी नेत्याची हिंमत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसी दांभिक व लाचार आहेत हेच खरे! सदर वक्तव्यावर केस होणे आवश्यक आहे.
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, वीर सावरकर अभ्यासक, इतिहासकार
काँग्रेस कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी
राहुल गांधी यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या निवासस्थानापासून पोस्टरबाजी सुरु केली आहे. यामध्ये ‘मी सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे! ‘, ‘ मोदी, शाह हा राहुल गांधी आहे, झुकणार नाही’, अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
हो, राहुल गांधी सावरकर नाहीतच. सावरकर होण्यासाठी ब्रिटिशांशी लढता-लढता पन्नास वर्षे काळे पाण्याची शिक्षा ओढवून घ्यायला लागते. क्रांतिकारकांना स्वातंत्र्याची प्रेरणा द्यावी लागते, स्वतःच्या संसाराची देशाच्या स्वातंत्र्यासाठी राख रांगोळी करून घ्यावी लागते. खूप प्रतिभा लागते, महाकवी असावे लागते. उत्कृष्ट निबंधकार असावे लागते, प्रत्यक्ष कृतीतून सुद्धा समाजक्रांती करावी लागते. इतिहासावर आणि पुढील पिढ्यांवर आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवावा लागतो. स्वतंत्र भारतात सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप लागून चौकशीला सामोरे जाणाऱ्यांना सावरकर होणे अशक्य गोष्ट आहे. एक वेळ साधा काजवा सुद्धा प्रकाशामुळे सूर्याशी खूप दूरचे का होईना नाते सांगू शकेल पण चिलटाला तो सुद्धा अधिकार नाही. राहुल गांधींचे नाव सावरकर नाही हे आमचे भाग्यच आहे.
– चंद्रशेखर साने, वीर सावरकर साहित्य अभ्यासक, इतिहासकार
(हेही वाचा राज्यसभेचाच फॉर्म्युला राज्यात सत्तापालट होणार?
५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला ‘तुमचे राज्य तरी ५० वर्षे टिकेल काय?’ असे भर न्यायालयात ठणकावून विचारणारे वीर सावरकर, आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे. राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या..
– चित्रा किशोर वाघ, भाजप, प्रदेश उपाध्यक्ष