पंतप्रधान होण्याच्या मुद्यावर शरद पवार म्हणतात, मी ८२ वर्षांचा…

150

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान होणार, अशी चर्चा अधूनमधून होत असते, पण त्या त्या वेळी पवार या चर्चेला पूर्णविराम देतात. मोरारजी देसाई हे ८२ वर्षांचे होते, तेव्हा ते पंतप्रधान झाले होते. मीदेखील सध्या ८२ वर्षांचा आहे, परंतू मी हा कित्ता गिरवणार नाही. मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसेच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणूक महाविकास आघाडीने लढवावी

आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढावी, असे आमचे मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जावे का, याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आपले मत आहे, असेही पवार म्हणाले. मोदी सरकारविरोधात पर्याय देण्यासाठी माझ्याच घरात बैठक झाली. हे लगेच होणार नाही. त्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहे. काही विषय ठरले आहे. त्यानुसार, निर्णय घेण्याचे ठरले आहे, असेही पवारांनी तिसऱ्या आघाडीबद्दल सांगितले.

(हेही वाचा गुवाहाटीचे तिकीट भास्कर जाधवांनाही पाहिजे होते; निलेश राणेंचा गौप्यस्फोट)

शिवसेना पक्ष संघर्षाचा निकाल १-२ सुनावण्यांत लागणार

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या पक्षसंघर्षाचा निकाल पुढील ५ वर्षांत लागणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे काही तरी जुळले याचा संशय येत आहे. पण, सर्वाेच्च न्यायालयामध्ये ५ वर्ष वाट पाहण्याची गरज वाटत नाही. पुढील एक-दोन सुनावण्यांमध्ये याचा निर्णय लागू शकतो, असेही पवारांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.