राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तब्बल 23 दिवसांनी राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. या वेळी शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘दोनच दिवसांत खातेवाटप पूर्ण होईल’, असे फडणवीस यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही प्रश्न विचारण्यात आले. (Ajit Pawar)
(हेही वाचा- Mahakumbh : प्रयागराज येथे कुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा तैनात)
अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता, त्यावर अजित पवारांनी (Ajit pawar) दिलेल्या उत्तराने एकच हशा पिकला. प्रश्न ऐकताच बाजूला बसलेले अजित पवार म्हणाले, मी अडीच महिन्यासाठी ही होऊ शकतो ! त्यांचे उत्तर ऐकून सर्वच खळखळून हसले. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्य मंत्री आहेत. (Ajit Pawar)
महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर सदस्यांना योग्य उत्तर
चहापानावर अलीकडे विरोधी पक्ष सतत बहिष्कार घालतात, त्यामुळे चहापान करावा की नाही करावं असा प्रश्न पडला आहे. विरोधक संख्येने कमी असले, तरी महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर सदस्यांना योग्य उत्तर दिले जातील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे, म्हणून रेटून सभागृह चालवायचे, असे कधीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी आधीच ही भूमिका स्पष्ट केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. (Ajit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community