प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एका मेळाव्यात केलेल्या विधानावर माफी मागितली आहे. “माझा शब्द चुकला” असं म्हणत त्यांनी सर्व पत्रकारांसमोर आपली चूक कबूल केली आहे.
नेमका प्रकार काय?
जळगावमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात (Bacchu Kadu) बच्चू कडू बोलत होते. “मी आमदार होणार नाही याची पर्वा नाही. मात्र शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार हा माझा पक्ष आहे,” असं आमदार बच्चू कडू म्हणाले. मात्र हे सांगत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं. पण आपली चूक लक्षात येताच माफी मागत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “आज-काल हिजडे सुद्धा आमदार होतात,” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं. परंतु “आज-काल आंडू पांडू लोकही आमदार होतात असं आपल्याला म्हणायचं होतं,” अशी सारवासारव बच्चू कडू यांनी केली.
(हेही वाचा – Parliament Special Session 2023 : संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये ‘या’ विधयकांवर होणार चर्चा)
नेमकं काय म्हणाले होते बच्चू कडू
आमदार (Bacchu Kadu) बच्चू कडू हे रविवारी (17 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असे लोकही आमदार होतात. हिजडे सुद्धा आमदार होतात.”
चूक लक्षात येताच माफी
मात्र मेळाव्यातील भाषणात बोलताना चूक झाल्याचं त्यांचं लक्षात आलं. चुकीची कबुली देत पत्रकारांशी बोलताना (Bacchu Kadu) बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली आणि या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आंडू-पांडू लोकही आमदार होतात असा माझा म्हणण्याचा उद्देश होता, असं बच्चू कडू यांन यावेळी स्पष्ट केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community