क्रुझ पार्टीचं निमंत्रण होते, अस्लम शेख यांची कबुली

गेल्या काही महिन्यांपासून कॉर्डिलिया क्रुजवरील पार्टीने राज्यात कित्येक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या ड्रग्ज क्रुज पार्टीला एका मंत्र्याला बोलवले होते, असा आरोप भाजप नेते मोहित भारती यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तो मंत्री अस्लम शेख असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या प्रकारणात पालकमंत्री अस्लम शेख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याप्रकरणी अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान क्रुझ पार्टीचे निमंत्रण दिले होते, अशी कबुली पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

असे म्हणाले अस्लम शेख…

यावेळी अस्लम शेख असे म्हणाले की, मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिले होते. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हेही मला माहीत नाही. त्या प्रकरणाचा तपास एजन्सीने करावा, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. काशिफ खान यांच्या आमंत्रणावर अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया देताना असे सांगितले की, मी काशिफ खान अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावले होते. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण दिले होते. मात्र आता या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा तपास एजन्सीकडून सुरू आहे.

(हेही वाचा- ‘त्या’ पार्टीचे अस्लम शेख यांनाही निमंत्रण, तरीही ते गप्प का?)

‘काशिफशी फोनवर संभाषण झालंच नाही’

अस्लम शेख यांनी असेही सांगितले की, काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहित नाही. माझा मोबाईल माझ्या पीएजवळ असतो. त्याची आणि माझी एका ठिकाणी भेट झाली. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिले होते. आता त्या पार्टीत काय होणार होते हे मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावे. मात्र काशिफ खानशी फोनवर कोणतंही संभाषण झालंच नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here