शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) शिबिरात मंत्री धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “त्या वेळी मी अजित पवार यांना सावध करत जाऊ नका असे सांगितले होते. मी दादांच्या पाया पडून विनंती केली की हे षडयंत्र आहे, पण त्यांनी ऐकले नाही.” (Dhananjay Munde)
(हेही वाचा- Mumbai-Pune Expressway वर बर्निंग बसचा थरार; बस चालकाच्या प्रसंगावधामुळे अनर्थ टळला! )
मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान २०१९ च्या राजकीय उलथापालथीचे संदर्भ देत, त्या वेळच्या घटनांचा उलगडा केला. त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या जवळच्या नातेसंबंधांवर भाष्य करत, “मी त्यांना धोक्याची जाणीव करून दिली होती,” असे सांगितले. (Dhananjay Munde)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात होत असलेल्या आरोपांबाबतही मुंडे यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी म्हटले, “माझ्या विरोधात हे सर्व षडयंत्र सुरू आहे. मला खोट्या आरोपांत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.” (Dhananjay Munde)
(हेही वाचा- Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू)
आक्रमक भाषणाची चर्चा
धनंजय मुंडे यांचे संपूर्ण भाषण आक्रमक आणि स्पष्ट होते. त्यांनी आपल्या विरोधकांवर टीका करत, “हे षडयंत्र माझ्या राजकीय वाटचालीला बदनाम करण्यासाठी आहे,” असे ठामपणे सांगितले. (Dhananjay Munde)
मुंडे यांच्या या भाषणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, २०१९ च्या घटनांवरील त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा त्या काळातील राजकीय गोंधळ उघड झाला आहे. (Dhananjay Munde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community