I.N.D.I.A. Alliance : देशभरात सभा घेणार इंडिया आघाडी

या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली.

150
I.N.D.I.A. Alliance : देशभरात सभा घेणार इंडिया आघाडी
I.N.D.I.A. Alliance : देशभरात सभा घेणार इंडिया आघाडी

“जागा वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु करावी, यावर चर्चा झाली. देशभरात सभा घेण्याचं ठरलं आहे. भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभा घेतली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला”, अशी माहिती काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली.

काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आजच्या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याविषयी माहिती दिली. “जागा वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु करावी, यावर चर्चा झाली. देशभरात सभा घेण्याचं ठरलं आहे. भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभा घेतली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला”, अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

इंडिया आघाडीत सुरु असलेल्या घडामोडींमुळे भाजपचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कारण इंडिया आघाडीचे नेते आता देशभरात फिरणार आहेत. इंडिआ आघाडीची पहिली सभा ही भोपाळमध्ये घेण्यात येणार आहे. देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सभा पार पडणार आहे. या सभांमधून इंडिया आघाडीचे नेते भाजपवर घणाघात करणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी या सभा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

समितीच्या सदस्यांनी अजेंडा तयार केला असून, त्याला बैठकीत अंतिम रूप दिले गेले. या बैठकीत संयुक्त रॅली, संयुक्त प्रचार आणि सोशल मीडिया रणनीती यावर निर्णय घेण्यात आले. निवडणूक आणि प्रचाराचा रोडमॅप तयार करण्यासाठी राज्यांची ४ श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा पहिल्या आणि महत्त्वाच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Indian Army General Manoj Mukund Naravane : अखेर कोणाला तरी चीनचा खरा नकाशा मिळाला)

पहिल्या श्रेणीतील पाच राज्यांमध्ये आघाडीची ताकद आणि समान रणनीती यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या २१२ जागा असून त्यापैकी १८० हून अधिक जागा भाजपकडे आहेत. २०१९ नंतर या राज्यांची राजकीय स्थिती बदलली आहे. यूपीमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपा केवळ ४७ जागांवर घसरली होती. २०२२ मध्ये त्याच्या जागा १११ पर्यंत वाढतील.

बिहारमध्ये जेडीयूने भाजपपासून दूर राहून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले आहे. झारखंडमध्येही विरोधी पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात सरकार एनडीएचे आहे, तरीही शरद पवार-उद्धव ठाकरे जोडी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा दावा काँग्रेस करत आहे. अशाच प्रकारे विविध राज्यांना वेगवेगळ्या विभागात विभागले गेले आहे. त्यानुसार तेथे सभा तसेच बैठक आयोजित करण्यात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.