I.N.D.I Aghadi मध्ये फुट; काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्यासाठी ‘आप’च्या हालचाली

59
I.N.D.I Aghadi मध्ये फुट; काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्यासाठी 'आप'च्या हालचाली
I.N.D.I Aghadi मध्ये फुट; काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्यासाठी 'आप'च्या हालचाली

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस (Congress) स्वतंत्रपणे निवडणुक लढत असल्याने इंडी आघाडीत वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे इंडी आघाडीला (I.N.D.I Aghadi ) तडा जात आहे, अशीही चर्चा राजकीय वातावरणात आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला इंडी आघाडीतून (I.N.D.I Aghadi ) बाहेर काढण्याच्या हालचाली आम आदमी पक्षाने सुरु केल्या आहेत. दरम्यान काँग्रेसने आप प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळेच काँग्रेसला इंडी आघाडीतून (I.N.D.I Aghadi ) बाहेर काढण्याची भूमिका घेतली जात आहे.

( हेही वाचा : Thane येथे देशातील पहिली दिव्यांगांसाठीची ‘सुगम्य सिग्नल यंत्रणा’ कार्यरत

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाचा पार दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी आप (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केल्याने आप कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेस (Congress) नेत्याने, आप (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल अस्तित्त्वात नसलेली योजनेद्वारे लोकांची दिशाभूल करत त्यांची फसवणूक करत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. मात्र काँग्रेसने अशाप्रकारे उघडपणे घेतलेल्या भूमिकेमुळे आपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.(I.N.D.I Aghadi )

यासंदर्भात आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते अजय माकन आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांच्यावर हल्ला चढवला. तसेच अरविंद केजरीवाल यांना देशविरोधी म्हणणाऱ्या अजय माकन यांच्यावर काँग्रेसने २४ तासात कारवाई करावी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मदत करण्यासाठी काँग्रेस (Congress) सर्व काही करत आहे, असे गंभीर आरोप ही सिंह यांनी केला आहे.(I.N.D.I Aghadi )

दरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणात झालेल्या इंडी आघाडीच्या (I.N.D.I Aghadi ) मानहानीकारक पराभवामुळे आघाडीत नेतृत्त्व बदलाचे वारे वाहत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनीही ममतांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडी आघाडीत फुट पडत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. (Aam Aadmi Party)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.