I.N.D.I. Alliance Meeting : नितीश कुमारांची नाराजी, तर अखिलेश यांचे मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर राजधानीतील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, ती अखिलेश यादव यांच्या बैठकीमध्ये मौन राहण्याची आणि नितीश कुमार यांच्या नाराजीची.

169
I.N.D.I. Alliance Meeting : नितीश कुमारांची नाराजी, तर अखिलेश यांचे मौन
I.N.D.I. Alliance Meeting : नितीश कुमारांची नाराजी, तर अखिलेश यांचे मौन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) हरविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) बैठकीनंतर राजधानीतील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, ती अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या बैठकीमध्ये मौन राहण्याची आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नाराजीची. इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) नेत्यांची चौथी बैठक मंगळवारी (१९ डिसेंबर) अशोका हॉटेल, दिल्ली येथे झाली. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचवले आहे. अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला. एमडीएमके (मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम) खासदार वायको यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. (I.N.D.I. Alliance Meeting)

मात्र, पंतप्रधानांच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मौन बाळगले. तर नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज होऊन बैठकीमधून बाहेर पडले. यामुळे इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) एकूणच आलबेल नसल्याचे दिसून येते. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी अनेक नेते आधीच तयारीत असताना खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आल्यावर अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) चिंतेत दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खरगे म्हणाले, सर्व प्रथम आम्हाला जनतेला जिंकायचे आहे, आधी त्याचा विचार करायला हवा. यावर काम करणार. आमच्याकडे खासदार नाहीत तर आम्ही पंतप्रधान चेहऱ्यावर बोलून काय करणार. (I.N.D.I. Alliance Meeting)

या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar), फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि आरएलडीचे जयंत चौधरी हेही उपस्थित होते. बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, चौथ्या बैठकीत २८ पक्ष सहभागी झाले होते. आघाडीसमोर नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र कसे काम केले पाहिजे किंवा कोणताही मुद्दा सुरुवातीपासूनच मांडला पाहिजे. देशभरात किमान ८-१० बैठका घेण्याचे ठरले. (I.N.D.I. Alliance Meeting)

(हेही वाचा – Devendra Fadanvis : श्री शनेश्वर देवस्थानाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा)

भाजपच्या विरोधात ४०० जागांवर समान उमेदवार उभे करण्याचे लक्ष्य

भाजप सरकारमध्ये (BJP Govt) खासदारांना संसदेतून निलंबित केले जात आहे. हे अलोकतांत्रिक आहे. यासाठी सर्वांना एकत्रितपणे लढा द्यावा लागेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच बैठकीमध्ये २०२४ च्या निवडणुकीच्या धोरणावर चर्चा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागावाटपाचा मुद्दा बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू होता. जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम करण्यावर विरोधी पक्षांचा भर राहिला. भाजपच्या (BJP) विरोधात ४०० जागांवर समान उमेदवार उभे करण्याचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर २७५ ते ३०० जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे. इतर पक्षांना केवळ २००-२५० जागा देण्याच्या बाजूने पक्ष आहे. (I.N.D.I. Alliance Meeting)

बैठकीत आघाडीच्या समन्वयकाच्या नावावर चर्चा झाली. त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्या नावांचा विचार केला जाऊ शकतो. सनातन आणि भगवा या भाजपच्या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर जावे, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मोदी आणि भाजपला विरोध करण्यासोबतच इंडीने (I.N.D.I. Alliance) देशासाठी कोणती योजना आखली आहे यावर चर्चा झाली. उमेदवार निश्चित झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा सूर कसा सेट करायचा यावर बैठकीत चर्चा झाली. कुठे, किती रॅली होतील आणि स्टार प्रचारक कोण असतील. निवडणूक प्रचाराचे ब्रँडिंग कसे केले जाईल आणि त्यासाठी कोणत्या एजन्सींची मदत घेता येईल? यावर चर्चा झाली.या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेतील १४१ खासदारांच्या निलंबनावर चर्चा झाली. विरोधी पक्षांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला. (I.N.D.I. Alliance Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.