I.N.D.I. Alliance : भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार!; इंडी आघाडीचा डाव उत्तर प्रदेशात फसला

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एक निर्णय घेऊन इंडी आघाडीचा डाव उधळून लावला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे.

214
I.N.D.I. Alliance : भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार!; इंडी आघाडीचा डाव उत्तर प्रदेशात फसला
I.N.D.I. Alliance : भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार!; इंडी आघाडीचा डाव उत्तर प्रदेशात फसला
  • वंदना बर्वे

लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपच्या विरोधात एकच संयुक्त उमेदवार उतरविण्याचा इंडी आघाडीचा (I.N.D.I. Alliance) डाव फसला आहे. महत्वाचे म्हणजे, हा डाव लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तरप्रदेशात फसला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांनी एक निर्णय घेऊन इंडी आघाडीचा (I.N.D.I. Alliance) डाव उधळून लावला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे. यामुळे इंडी आघाडीला (I.N.D.I. Alliance) जबरदस्त धक्का बसला आहे. (I.N.D.I. Alliance)

मायावती (Mayawati) यांनी इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) सामील व्हावे यासाठी कॉंग्रेसकडून खूप प्रयत्न केले जात होते. परंतु, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या व्यवहारामुळे मायावती (Mayawati) दुखावल्या गेल्या आणि त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हरविण्यासाठी इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांनी भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी एकच उमेदवार उतरविला तर भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार नाही हा त्यामागचा हेतू होता. मात्र, लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तरप्रदेशातच विरोधकांचा डाव उधळला गेला आहे. सपाच्या आडमुठेपणाचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत भोगावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) अन्य घटक पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. (I.N.D.I. Alliance)

पश्‍चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, बिहारसह अन्य राज्यांमध्ये आघाडीत जागा वाटपाचे घोंगडे अजूनही भिजत आहे. कॉंग्रेसकडून अन्य राज्यांतील वाद मिटविण्यासोबतच बसपाला आघाडीत आणण्याचा प्रयत्न होत होता. काँग्रेसनुसार, उत्तर प्रदेशात बसपाचा एकही खासदार निवडून आला नसला तरी मायावती (Mayawati) यांच्या हातात दलितांची वीस टक्के मते आहेत. ही बाब कॉंग्रेसने सपाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्नांना यश आले नाही. याशिवाय मायावती (Mayawati) यांची मुस्लिम मतांवरही काही पकड आहे. २०१४ मध्ये स्वबळावर निवडणूक लढविल्यानंतरही बसपाला १९.७७ टक्के मते पडली होती. २०१९ मध्ये बसपाने सपासोबत निवडणूक लढविली होती. यावेळी १९.४३ टक्के मते मिळवित बसपाचे दहा खासदार विजयी झाले होते. २०१४ मध्ये सर्वात वाईट कामगिरी असली तरी ३० पेक्षा जास्त जागांवर बसपा (BSP) दुसऱ्या स्थानावर होते. (I.N.D.I. Alliance)

(हेही वाचा – Maharashtra : राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर!)

यूपीमध्ये काँग्रेसची ताकद खूपच कमी

दरम्यान, अखिलेश यादव यांनी आपल्या आमदारांना मायावती (Mayawati) या ज्येष्ठ नेत्या असल्याने त्यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरू नयेत अशी सूचना केली. तर, बसपाने सुध्दा कॉंग्रेसप्रती मवाळ भूमिका घेतली होती. परंतु, सपा-बसपा यांच्यात छत्तीसचा आकडा कायम आहे. दरम्यान, मायावती (Mayawati) यांनी अखिलेश यादव यांच्यावर गिरगिटासारखी भूमिका बदलणारे नेते असा आरोप केला आहे. सोमवारी मायावती यांनी वाढदिवशी आघाडी नाकारल्याची घोषणा केली. यावेळी सपा बसपाच्या रडारवर होते. यूपीमध्ये काँग्रेसची ताकद खूपच कमी आहे. २०१४ मध्ये फक्त ७.५३ टक्के मते मिळाली होती तर २०१९ मध्ये फक्त ६.३६ टक्के मते मिळाली होती. कोणत्याही जातीच्या व्होट बँकेवर त्यांची पकड नाही. (I.N.D.I. Alliance)

ओबीसीच्या नावावर सपाकडे आता फक्त यादव समाज जोडला गेला आहे. याशिवाय मुस्लिम मतदारही सपासोबत आहे. परंतु, मुस्लिम बसपाचीही व्होटबॅंक आहे. मुस्लिम मतांची एकजूटही भाजपला हरवू शकत नाही, हे २०१९ मध्ये सपा-बसपा युतीमध्ये दिसून आले. आरएलडीचा प्रभाव फक्त पश्चिम उत्तर प्रदेशात काही प्रमाणात जागांपर्यंत मर्यादित आहे. अशा स्थितीत बसपाच्या प्रवेशाने दलितांच्या मोठ्या व्होटबँकेत भर पडली असती आणि मुस्लिम मतांचे विखुरणे टळले असते, असे कॉंग्रेसला वाटत होते. महत्वाचे म्हणजे, मायावती यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्तरप्रदेशात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शिवाय, भाजपविरोधात संयुक्त उमेदवार देण्याची इंडी आघाडीची (I.N.D.I. Alliance) आशा सुध्दा मावळली आहे. (I.N.D.I. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.