ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मी भाजपासोबत गेलो; Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्याने खळबळ

95
ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मी भाजपासोबत गेलो; Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्याने खळबळ
ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मी भाजपासोबत गेलो; Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्याने खळबळ

केवळ ईडीच्या (ED) कारवाईपासून वाचण्यासाठी मी भाजपसोबत (BJP) गेलो असे वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

या पुस्तकातील मुलाखतीत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका. ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते.” असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

‘भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका’
“दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.” (Chhagan Bhujbal)

‘भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका’
“अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली.” असं छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. (Chhagan Bhujbal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.