बुधवारी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये (Assembly Election 2024) एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी २३ नोव्हेंबर मतमोजणी होईल. दरम्यान, दादर-माहीम मतदार संघात (Dadar-Mahim Constituency) तिरंगी लढत होणार आहे. या लढतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray), तर महायुती शिवसेना पक्षाकडून सदा सरवणकर (Sada Saravankar) यांना, तर उबाठा गटामधून महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी मी विजयी होईन असा विश्वास व्यक्त केला. (Amit Thackeray) अमित ठाकरे म्हणाले की, “जनतेला बदल हवाय, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, प्रचंड जनसमुदाय माझ्या पक्ष्याच्या समर्थनासाठी रॅलीत सहभागी झाला आहे. त्यामुळे मला तर ही रॅली म्हणजे निवडणुकीनंतरची विजयी मिरवणुकच वाटते आहे. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि उत्तम आहे. या लोकांच्या कृपेने मी आमदार झाल्यावर जे प्रश्न झटपट सोडवता येतील ते मी नक्कीच सोडवेन. मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी होईल हे पूर्णपणे जनतेवर अवलंबून आहे. मी माझ्याबाजूने १०० टक्के प्रयत्न करतोय पण जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून मी विजयी होईन असा विश्वास आहे. पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही माझ्याशी पुन्हा बोलायला याल, तेव्हा मी आमदार म्हणून योग्य ती सर्व कामे केलेली असतील”, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) विजयाचा विश्वास व्यक्त केला.
(हेही वाचा –हिंदू मतदान करतील, तर कट्टर हिंदू राजा येईल; Kalicharan Maharaj यांचे हिंदूंना मतदानाचे आवाहन ) माहीममधून भाजपानं मनसेच्या अमित ठाकरेंना (Amit Thackeray) अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिलाय. मात्र, उघडपणे अर्थातच महायुतीचे सदा सरवणकर यांच्या मागे भाजपा आणि शिवसेना पक्ष आहे. त्यात ठाकरे उबाठा पक्षाचे महेश सावंतांना (Mahesh Sawant) उभं केल्यानं माहीमची लढत तिरंगी बनली आहे.