‘पश्चिम बंगालमध्ये येऊन जागा दाखवू’; भाजपाच्या Navneet Rana यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

67
‘पश्चिम बंगालमध्ये येऊन जागा दाखवू’; भाजपाच्या Navneet Rana यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
‘पश्चिम बंगालमध्ये येऊन जागा दाखवू’; भाजपाच्या Navneet Rana यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Navneet Rana : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांवर बोलताना भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. (Navneet Rana)  निवडणुका येतात तेव्हा ‘हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात’, असा आरोप नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर केला. पश्चिम बंगालमध्ये जाऊन आम्ही हिंदुत्ववादी ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. त्या भिवंडी येथील बागेश्वर धाम मंदिरात आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या. (Navneet Rana)

(हेही वाचा – Nitin Gadkari : देशात आता टोलनाके रहाणार नाहीत; १५ दिवसांत येणार नवी पॉलिसी)

वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात (Waqf Amendment Bill) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंसाचार उसळला होता. सैन्य तैनात केल्यानंतर तेथील परिस्थिती सुधरत आहे. मात्र, या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) भाजपा नेत्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानेच येथील हिंसाचाराला बळ मिळाला, असा आरोप पश्चिम बंगालमधील भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता नवनीत राणा यांनी देखील ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाल्या नवनीत राणा?
पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदींनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात. जेणे करून हिंदुत्ववादी विचारांना रोखता येईल. हिंदुत्वाला विरोध करून एवढे वर्ष ममता दीदी सत्तेवर बसल्या आहेत. बांगलादेशातून जसे हिंदूंना हाकलून दिले जाते, ममता दीदीसुद्धा पश्चिम बंगालमध्ये तसे करू पाहत आहेत, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. पण, आता देशात हिंदुत्व विचारांचे सरकार आहे. त्यामुळे, त्यांचा प्रयत्न अपयशी होणार आहे. गरज पडली तर हजारो हिंदुत्व विचारांचे कार्यकर्ते पश्चिम बंगाल येथे जाऊन ममता दीदी यांना त्यांची जागा दाखवतील, असे म्हणत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Navneet Rana)

(हेही वाचा – घोटाळेबाज Mehul Choksi ला भारतात आणण्यासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर करणार)

नवनीत राणा म्हणाल्या, देशात हिंदुराष्ट्र बनवण्याचा संकल्प गुरुजींचा आहे, त्याला मदत करण्याची आमची भूमिका आहे. धीरेंद्र शास्त्री महाराज जे काम करीत आहेत, हिंदू राष्ट्र म्हणून त्यांनी जो प्रण केला आहे, त्यासोबत आमच्या सारखे भक्त जोडले गेलो आहोत. त्यांच्या सोबत लाखो भक्त, युवक, राजकीय लोक जोडली गेली आहेत. गुरुजींच्या या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे.

उद्धव ठाकरेंना रामभक्त पचनी पडत नाही
उद्धव ठाकरे यांना सुद्धा सत्तेत येण्याची घाई झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होत, याबाबत विचारले असता, घमेंड चांगल्या चांगल्यांना ताळ्यावर आणून सही रस्त्यावर येण्यापासून रोखतात. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा घमेंड आहे, त्यांना रामभक्त कधी पचनी पडत नाहीत, असे म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.