Vijay Shivtare : मी बारामती लोकसभा लढवणारच; विजय शिवतारे यांची घोषणा

बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही, असे विजय शिवतारे म्हणाले.

277

आपण बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी जाहीर केला. यासंदर्भात बारामती येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. पदाधिकाऱ्यांचा शिवतारेंना पाठिंबा आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

बारामती मतदारसंघ काही कोणाचा सातबारा नाही

लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असून बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार यांना आव्हान दिले आहे. बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. म्हणून पवार-पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचे, असा निर्धार व्यक्त करत शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला.

(हेही वाचा Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींची विशेष न्यायाधीशांसमोर ओळख परेड झालीच नाही; आरोपींच्या वकिलांचा न्यायालयात खळबळजनक दावा)

काय म्हणाले शिवतारे? 

पत्रकार परिषदेत बोलताना विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. 2019च्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला पण तो राजकारणाचा भाग होता, निवडणुकीत कर्तव्य म्हणून केले होते. त्यात काहीच वैयक्तिक नव्हते. पण अजित पवार यांनी नीच पातळी गाठली. मी २३ दिवस रुग्णालयात होतो, ट्रीटमेंट सुरू असतानाही मी अँब्युलन्समधून प्रचार केला. तेव्हा (माझी) पालखी जाणार, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय? तुम्ही खोटे बोलताय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे खोट बोलत आहात, असा गलिच्छ आरोप त्यांनी केला. खालच्या थरावर ते उतरले. तू पुढे कसा निवडून येतोस तेच मी पाहतो, अशी धमकीही त्यांनी दिल्याचा आरोप शिवतारे (Vijay Shivtare) यांनी यावेळी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.