पूजा सिंघलांच्या डायरीत बड्या नेत्यांची नावे! धक्कादायक खुलासे होणार 

झारखंड येथील प्रशासकीय अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरावर ईडीने धाडी टाकल्यावर त्यांच्या घरातून कोट्यवधी रकमेच्या नोटा सापडल्या. त्या मोजायला अक्षरश: मशिन मागवावी लागली. त्यामुळे देशभर खळबळ उडाली. आता ईडीने पूजा सिंघल यांची चौकशी सुरु केल्यावर त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या डायरीत मोठमोठ्या नेत्यांची नावे सापडल्याने ईडी आता पूजा सिंघल यांचे कुणाशी व्यवहार झाले होते का, याची तपासणी करत आहे. त्यामुळे यातून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१५० कोटींची अवैध संपत्ती समोर

भारतीय प्रशासकीय अधिकारी पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा, सीए सुमन कुमार आणि पूजा सिंघल यांचे निकटवर्ती यांच्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्यावर १९.३१ कोटी जप्त केले. तसेच बेहिशेबी संपत्तीचे दस्तऐवज मिळाले आहेत. त्याच बरोबर पूजा सिंघल त्यांच्याकडे एक डायरीही मिळाली आहे. त्यामध्ये अनेक बड्या नेत्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. या डायरीत मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहाराची माहिती आहे. तसेच या डायरीत राजकीय क्षेत्रातील लोक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांचे नावे, मोबाइल नंबर आहेत. या लोकांची ईडीकडून चौकशी होऊ शकते. सिंघल यांच्याकडे सापडलेल्या दस्तऐवजानुसार जवळपास १५० कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीची माहिती समोर आली आहे. याशिवाय २० पेक्षा अधिक बनावट कंपन्यांची माहितीही मिळाली आहे.

(हेही वाचा न्यायालयानंतर आता महापालिकेची राणा दाम्पत्याला नोटीस )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here