सात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या! परदेशींची मराठी भाषा विभागात नियुक्ती!

प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबतच राज्यातील इतर ६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

77

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्यामुळे आणि त्यावर नियंत्रण मिळ्वण्यात अपयश मिळत असल्याने तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी इकबाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली. आता प्रवीणसिंह परदेशी यांना मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्त करण्यात आली आहे. प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबतच राज्यातील इतर ६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची झाली बदली?

  • १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना मंत्रालयातील मराठी भाषा विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती.
  • रणजित कुमार (२००८) यांची मंत्रालयातील आयटी विभागाच्या संचालक पदावरून मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव पदावर बदली.
  • व्ही.पी. फड (२०११) यांची उस्मानाबादच्या सीईओ पदावरून मराठवाडा स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य सचिव पदावर बदली.
  • पंकज आशिया (२०१६) यांची भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली.
  • राहुल गुप्ता (२०१७) यांची गडचिरोली अहेरीतल्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि सहय्यक जिल्हाधिकारी यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली.
  • मंनुज जिंदाल (२०१७) गडचिरोली भामरागडच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि अटापल्ली सबडिव्हिजनचे सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची जालना जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून बदली.
  • मिताली सेठी (२०१७) यांची अमरावती धेरणीच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली.

(हेही वाचा : कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना नुकसान भरपाई द्या! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.