रोखठोक निर्णयांसाठी परिचित असलेल्या ‘आयएएस’ तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील त्यांच्या १६ वर्षांच्या करिअरमधील ही २० वी बदली आहे. आता दीपक केसरकर मंत्री असलेल्या मराठी भाषा विभागाच्या सचिव पदाची धुरा ते सांभाळतील. मुंढे यांच्यासह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. त्यात सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे.
आरोग्य विभागाकडून कार्यमुक्त केल्यानंतर तुकाराम मुंढे यांना अनेक महिने नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यानंतर गेल्या महिन्यात ३ मे रोजी मुंढे यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांचा अनेक महिन्यांचा वनवास संपल्याचीही चर्चा होती. मात्र, नव्या नियुक्तीला महिना होत नाही, तोच पुन्हा मुंढेंच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. त्यांची मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून युक्ती करण्यात आली आहे.
(हेही वाचा BMC : महापालिकेचे आशिष शर्मा यांची बदली; डॉ. सुधाकर शिंदे हे नवीन अतिरिक्त आयुक्त)
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
- सुजाता सौनिक यांची मंत्रालयात गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- एस.व्ही.आर श्रीनिवास यांची ‘एमएमआरडीए’मधून धारावी पुनर्विकास प्रकल्प मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- लोकेश चंद्र यांची ‘महाडिस्कॉम’च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- राधिका रस्तोगी यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- आय. ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- संजीव जयस्वाल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- आशीष शर्मा यांची नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- विजय सिंघल यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- अंशु सिन्हा यांची सचिव, बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- अनुप यादव यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- तुकाराम मुंढे, यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. अमित सैनी, यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. माणिक गुरसाल यांची महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- कादंबरी बलकवडे यांची महासंचालक, मेडा, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- प्रदिपकुमार डांगे यांची संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- शंतनू गोयल यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- पृथ्वीराज बी.पी. यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. हेमंत वसेकर यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.