महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठण केली तर गुन्हा दाखल झाला, त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्यांना १४ दिवस कारागृहात डांबून ठेवले. परंतु या दोघांचा आम्हाला अभिमान आहे. यापुढे कुणी हनुमान चालिसा पठण केले, तर त्यांचा जाहीर सत्कार करू असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
काय म्हणाले फडणवीस?
अमरावतीत राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात नवे सरकार आले आहे. आता येत्या काळात सण, उत्सव, जयंती जोरात साजरी केली जाईल. यापुढे कोणतेही निर्बंध, सक्ती असणार नाही. आता भ्रष्ट प्रवृतीचे सरकार गेले असून एकनाथ शिंदे आणि माझे सरकार आल्यामुळे आता जनतेला कसे खुले खुले वाटते. दहीहंडी ही हंडी नसून, तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. या हंडीतून निघणारी विकासाची मलई प्रत्येकापर्यंत पाेहचवू असे सांगत फडणवीसांनी खासदार आणि आमदार राणा दाम्पत्यांच्या समाजकार्य, विकासकामांची स्तुती केली. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेला ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
Join Our WhatsApp Community