Governor पदावर कोणता ज्येष्ठ नेता जाणार? वळसे पाटील की भुजबळ?

65
Governor पदावर कोणता ज्येष्ठ नेता जाणार? वळसे पाटील की भुजबळ?
  • खास प्रतिनिधी 

महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाकडून कमी मंत्रीपदे दिली गेली तर केंद्रात एक मंत्रीपद आणि एक राज्यपाल (Governor) पद मिळावे, अशी मागणी केली आहे. राज्यपाल पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेच तर अजितदादा कोणत्या ज्येष्ठ संभाव्य मंत्र्याला छोट्या राज्याच्या राज्यपालपदी पाठवतील? ६८ वर्षीय दिलीप वळसे-पाटील की ७७ वर्षीय छगन भुजबळ की ७० वर्षीय हसन मुश्रीफ?

‘गुलाबी’ बदल

लोकसभा परभवानंतर अजित पवार यांनी खचून न जाता पुन्हा कामाला लागले आणि विधानसभा निवडणुकीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून पक्षाच्या धोरणात काही ‘गुलाबी’ बदल केले. त्यानंतर विधानसभेला ४१ जागा निवडून आणल्या. यामुळे महायुतीत अजित पवार यांचे स्थान बळकट झाले.

(हेही वाचा – 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे Space Station होणार)

तडजोड आणि सामंजस्याची भूमिका

भाजपाशी तडजोड आणि सामंजस्याची भूमिका घेत अधिकाधिक मंत्रीपदे मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर मंत्रीपदे कमी दिली तर केंद्रात एक मंत्रीपद आणि एक लहान राज्याचे राज्यपाल पद द्यावे, अशी मागणी पवार यांनी भाजपाकडे केली आहे.

नागालँड, अरुणाचलमध्ये आमदार

केंद्रात मंत्रीपदी खासदार प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लावली जाईल, अशी शक्यता आहे. पण राज्यपाल (Governor) पदासाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्याची निवड करावी लागेल. नागालँड या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) सात आमदार असून अरुणाचल प्रदेशात तीन आमदार आहेत. त्यामुळे अशा लहान राज्याचे राज्यपाल पद अजित पवार यांच्या पक्षाला मिळू शकते.

(हेही वाचा – Kurla Best Bus Accident: अद्याप बेस्ट बससेवा बंद; रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट)

राज्यात दबदबा कमी होणार

यासाठी पक्षात ज्येष्ठ असलेले काही नेते आहेत त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील तसेच हसन मुश्रीफ असून यापैकी एकाला मंत्रीपदावर पाणी सोडून राज्यपाल (Governor) पदावर जावे लागेल. एकदा राज्यपालपद स्वीकारले की राज्यातील राजकारणात त्यांची सक्रियता कमी होऊन पर्यायाने दबदबाही कमी होतो, त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.