BMC Elections : भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढणार?

105
BMC Elections : भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढणार?
  • खास प्रतिनिधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महानगरपालिका निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. यात देशात एक श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेकडे विशेष लक्ष आहे. मुंबई महापालिकेसाठी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीत रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा स्वतंत्र लढण्याची शक्यता असून तसे संकेत उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले. (BMC Elections)

…तर भाजपा-सेना वेगळे लढणार

उबाठा आणि काँग्रेस यांनी मुंबईत वेगळी चूल मांडली तर महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि भाजपादेखील स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. (BMC Elections)

(हेही वाचा – ख्रिस्ती धर्मांतराचा डाव Hindu संघटनांनी उधळला; २ पाद्रींसह ७ जणांना अटक)

कार्यकर्त्यांची मागणी

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या गुरुवारी २३ जानेवारी २०२५ या दिवशी जाहीर सभेत कार्यकर्त्यांना संबोधले. तेव्हाच त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर सोमवारी २७ जानेवारी या दिवशी सकाळी संजय राऊत यांनी मुंबईत उबाठा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली. ते म्हणाले मुंबईची गोष्ट वेगळी आहे. इतर शहरांमध्ये मित्रपक्षांची ताकद मोठी असल्याने त्या ठिकाणी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे तर मुंबईत स्वतंत्रपणे लढण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. (BMC Elections)

शिवसेनेतही इच्छुकांची भाऊगर्दी

शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक इच्छुक काठावर उभे असून मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत. निवडणूक जाहीर होताच निवडणूक लढण्याची संधी मिळणार असेल तर शिवसेना उबाठाकडून शिवसेना (शिंदे) यांच्याकडे येणाऱ्यांचा ओढा वाढू शकततो. शिवसेना (शिंदे) पक्षातही महापालिका निवडणुक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. इच्छुक अनेक असल्याने शिवसेनेतही निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा सूर आवळला जात असल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेतही शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना अनेक प्रभागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (BMC Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.