हिंमत असेल तर काँग्रेसने मुस्लिम पक्षाध्यक्ष करावा; PM Narendra Modi यांचे आव्हान

आम्ही तो कायदा बदलून संविधानाचा सन्मान राखला. काँग्रेसने देशातल्या दीन दलित, आदिवासी यांचा हक्क हिरावून तो कट्टरपंथी आणि धर्मांध मुस्लिमांना दिला.

56

काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी पक्षाचा अध्यक्ष मुसलमान करून दाखवावा, तसेच निवडणुकीचे 50 टक्के तिकिटे मुसलमानांना द्यावीत, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हरियाणातल्या हिस्सारमधून काँग्रेसला दिले. हरियाणातील वेगवेगळे विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वक्फ सुधारणा कायद्याचे जोरदार समर्थन करत काँग्रेसचे वाभाडे काढले‌

पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 

काँग्रेसने संविधानाचा वापर आपल्या सत्तेच्या हत्यारासारखा केला. जेव्हा काँग्रेसची सत्ता धोक्यात आली तेव्हा काँग्रेसने संविधान गुंडाळून ठेवले. आज संविधान खिशात घेऊन फिरणारे संविधानाला फक्त सत्तेसाठी वापरत होते. डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की देशामध्ये कधीही धार्मिक आधारावर आरक्षण देता येणार नाही पण काँग्रेसने संविधान फाडून टाकून आपली राजवट असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक आधारावर मुसलमानांना आरक्षण दिले. काँग्रेसने तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी केवळ कट्टरपंथी मुस्लिमांना फायदा पोहोचवला. पसमांदा मुस्लिम, मुस्लिम महिला, मुस्लिम विधवा यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा West Bengal Violence : रस्त्यांवर जाळपोळ, इंटरनेट बंद … ; मुर्शिदाबाद हिंसाचाराचे काही Unseen Photos)

2013 मध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणातूनच त्यांनी वक्फ कायदा करून त्याला संविधानाच्या वरती नेऊन ठेवले होते. आम्ही तो कायदा बदलून संविधानाचा सन्मान राखला. काँग्रेसने देशातल्या दीन दलित, आदिवासी यांचा हक्क हिरावून तो कट्टरपंथी आणि धर्मांध मुस्लिमांना दिला. पण काँग्रेसने स्वतःच्या पक्षात कधी मुस्लिमांचा सन्मान केला नाही. काँग्रेसकडे जर हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीची 50 % तिकिटे मुस्लिमांना देऊन दाखवावीत. पण काँग्रेसला स्वतःच्या पक्षात मुस्लिमांना स्थान द्यायचे नाही, तर देशातल्या इतर सामान्य नागरिकांचा हक्क हिरावून घेऊन तो कट्टरपंथी मुस्लिमांना द्यायचा आहे. काँग्रेसचा हा देश विघातक विचार आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.