ठरलं तर… Eknath Shinde उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; उदय सामंत पत्र घेऊन राजभवनात दाखल

225
अखेर गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेले राजकीय नाराजीनाट्य संपुष्टात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री नाही झालात तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. अखेर एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीला यश आलं आहे, मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तर उदय सामंत (Uday Samant) हे एकनाथ शिंदेंसाठी राजभवनात दाखल झाले आहेत.   (Eknath Shinde) 
शिवसेनेच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. काही वेळापूर्वी ते राजभवनात पत्र घेऊन दाखल झाले असून, हे पत्रक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हाती सोपवणार आहेत.

(हेही वाचा – National Gallery of Modern Art: नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट देताय, तर ‘हे’ नक्की वाचा…)

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी 
या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) हा भव्य असा शपथविधी (cm oath) सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी २२ राज्याचे मुख्यमंत्री देखील हजर राहणार आहेत. चाळीस हजार लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.