मुंबईत पुन्हा कडक निर्बंध! अस्लम शेख यांच्याकडून सूतोवाच

सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे, असे मंत्री अस्लम शेख म्हणाले.

55

कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ही संख्या सप्टेंबरअखेर बरीच वाढेल, अशी शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. त्यामुळे या दरम्यान मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येतील, असे सूतोवाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केले.

राज्य सरकारकडून तिसऱ्या लाटेची तयारी 

सध्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अशा वेळी ही रुग्णसंख्या आणखी वाढेल. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. तशी भीती व्यक्त करून प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य सरकारने तिसऱ्या लाटेची तयारी सुरु केली आहे. अशातच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईबाबत धक्कादायक वक्तव्य केले.

(हेही वाचा : मंदिरासाठी बोंबाबोंब म्हणजे ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला’!)

तूर्तास रात्रीच्या संचारबंदीची गरज नाही! 

बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना नाईट कर्फ्यू, संचारबंदी जमावबंदी लागू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. यावरही अस्लम शेख यांनी भाष्य केले. तूर्तास तरी रात्रीची संचारबंदी, जमावबंदीची गरज नसल्याचेही अस्लम शेख म्हणाले. मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तर कडक निर्बंध करण्याची गरज आहे. अमेरिका, युरोप या देशात कोरोना लसीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, तेव्हा काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.