काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पुन्हा सत्तेत आले तर रामलला पुन्हा तंबूत असतील, ते राम मंदिरावर बुलडोझल चालवतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
मोदी सरकारची ‘हॅट्रिक’ होणार जगाला माहीत
बुलडोझर कुठे चालवायला हवा, यासंदर्भात या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्युशन घ्यावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. याशिवाय, जस-जशी निवडणूक पुढे जात आहे, I.N.D.I आघाडीतील सदस्य कमी होत आहेत. तसेच ही आघाडी देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवत आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना मोदी म्हणाले, त्यांना (अखिलेश यादव ) ममता बॅनर्जी यंच्या रुपात नव्या काकू मिळाल्या आहेत. समाजवादीच्या राजकुमाराला (अखिलेश यादव) एका नव्या काकूंकडे (ममता बनर्जी) शरण मिळाली आहे. या नव्या काकू बंगालमध्ये आहेत. या काकूंनी इंडी आघाडीला सांगितले आहे की, मी आपल्याला समर्थन करेल, पण बाहेरून. मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, ‘चार जून फार दूर नाही. मोदी सरकारची ‘हॅट्रिक’ होत असल्याचे आज संपूर्ण देश आणि जगालाही माहीत आहे. नव्या सरकारमध्ये मला गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप सारे मोठे निर्णय घ्यायचे आहे. यामुळे मी बाराबंकी आणि मोहनलालगंजमधील लोकांना आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.
Join Our WhatsApp Community