सरकार पडले तर विरोधी बाकात बसू! शरद पवारांचे महत्वाचे विधान

जर महाराष्ट्रातील सरकार पडले, तर आम्ही विरोधी बाकातही बसू शकतो, भाजपाला पाठिंबा का देऊ?, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे भाष्य केले.

सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न 

मागील अडीच वर्षापासूनचा सरकार पडण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. जेव्हा आमचे सरकार स्थापन होणार होते तेव्हा आमच्या काही आमदारांना हरियाणात घेऊन गेले होते, नंतर ते पुन्हा आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोट्यातील सगळी मते आमच्या उमेदवाराला मिळाली. आमच्या आघाडीतील एक उमेदवार जिंकू शकला नाही, हे सत्य आहे. त्याविषयी आम्ही आघाडीतील नेते बसून चर्चा करू, असेही पवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस मतदान होत असते आणि सरकार पुढे चालत असते. क्रॉस मतदान होते जेव्हा व्यक्तिगत संपर्कातून हे होत असते. १९८०मध्ये माझ्याकडे फक्त ६ मते होती त्यानंतर आम्ही ४५ मते मिळवून आमचा उमेदवार राज्यसभेत निवडून आणला होता.

(हेही वाचा फडणवीसांनी ‘पहाटे’ची ती चूक सुधारली! )

शिवसेनेची गाईडलाईन मिळाल्याशिवाय निर्णय नाही 

राज्यातील स्थिती पाहिल्यावर यातून काही तरी उपाय निघेल असा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांनी कधी त्यांना मुख्यमंत्री बनवा असे कधी सांगितले नव्हते. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी एनसीपीकडे आहे. मुखमंत्रीपदाबाबत काही बदल करायचा विषय उद्धव ठाकरेंचा आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. या घडामोडीत उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. त्यांची चर्चा झाल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. हा विषय शिवसेनेचा अंतर्गत आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, ते आमदार कुठे थांबले आहेत हेही मला माहित नाही. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोतच आहे मात्र या विषयात जोवर शिवसेनेची गाईडलाईन मिळत नाही तोवर काही निर्णय घेता येणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here