UBT ने केली नव्या पक्षाची तयारी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाने आता नव्या राजकीय पक्षाची आणि चिन्हाची मानसिक तयारी केली असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वेळेत म्हणजेच पुढील काही दिवसात नाही लागला तर नाइलाजास्तव उबाठाला वेगळा पक्ष नोंदणी करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

464
Shiv Sena UBT ला पडू लागली केंद्रातील सत्तेची स्वप्ने!
  • सुजित महामुलकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाने आता नव्या राजकीय पक्षाची आणि चिन्हाची मानसिक तयारी केली असल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वेळेत म्हणजेच पुढील काही दिवसात नाही लागला तर नाइलाजास्तव उबाठाला वेगळा पक्ष नोंदणी करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेत तसे संकेतही दिले. (UBT)

आचारसंहिता पुढील दोन महिन्यात

आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता पुढील दोन महिन्यात लागण्याची दाट शक्यता असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अपात्र न करण्याच्या निर्णयाविरुद्ध उबाठाने (UBT) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या खटल्याचा निकाल पुढील काही दिवसात लागला नाही तर उबाठा (UBT) गटाला लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणे अवघड होऊन बसेल. त्यामुळे उबाठाने नव्या पक्षाची तयारी सुरु केली असल्याचे समजते. (UBT)

(हेही वाचा – Maratha Reservation : जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत; बच्चू कडू यांचा दावा)

आम्ही मशाल घेऊन उतरू

मंगळवारी झालेल्या महापत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “मी तयार आहे. मी आव्हान देतो की कोर्टात निकाल नंतर लावा आता निवडणुका घ्या. इतकच नाही तर मी माझी मशाल निशाणीवर उतरेन आणि चोरांना (शिवसेना शिंदे गट) धनुष्यबाण घेऊन येऊ द्या, तरी मी तयार आहे.” (UBT)

तर नव्या पक्षाची नोंदणी

दोन दिवसांपूर्वी उबाठा पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनीही एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयात निकाल येण्यास उशीर झाला तर नव्या पक्षाची नोंदणी करुन नव्या चिन्हासह किंवा मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार. याचा अर्थ न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता पक्षाने नव्या पक्षनोंदणीची तयारी केली आहे. (UBT)

पुढील दोन वर्षात लोकसभा, विधानसभा, मुंबईसह, ठाणे, नागपूर आणि अन्य १२-१५ महानगरपालिकांना सामोरे जायचे असेल तर न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहता येणार नाही, याची मानसिकता पक्षाने केली आहे. (UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.