हिंदू हिंसक असते तर मला स्वातंत्र्य आणि सुरक्षा गमवावी लागली नसती; Nupur Sharma यांनी राहुल गांधींना सुनावले

170

हिंदू हिंसक आहेत, या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाच्या माजी प्रवक्ता नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी त्यांना चांगलेच सुनावले. जर हिंदू हिंसक असते मी सनातनी हिंदू मुलीला स्वातंत्र्य आणि सुरक्षा गमवावी लागली नसती, असे त्या म्हणाल्या.

गाझियाबाद येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. असे नाही की मी खूप काही करते. हिंदू धर्म फक्त माझ्या नाही. हा धर्म सर्वांचा आहे. मी एकटीच या धर्माची रक्षक आहे, असाही माझ्या (Nupur Sharma) दावा नाही. परंतु हिंदूंसाठी या जगात दूसरा कोणताही देश नाही, हे सत्य आहे.

(हेही वाचा व्‍हॉट्‍सअ‍ॅपवरील ‘Meta AI’ कडून हिंदूंच्या देवतांचा सर्रास अपमान; माफी मागण्याची हिंदूंची मागणी)

जेव्हा उच्च पदावर बसलेले लोक म्हणतात, हिंदू हिंसक आहेत, सनातनी यांना संपवले पाहिजे. मी त्यांनी सांगू इच्छिते की, मागील दोन वर्षांत मी जे पाहिले आहे, ते हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न आहे. काही लोकांची केवळ व्हाटसअप आणि फेसबुकवर काहीतरी लिहिल्याने काही लोकांची हत्या केली गेली आहे. त्यामुळे हिंदूंच्या विरोधात जे कट कारस्थान आखले जात आहे, ते ओळखावे, असेही आवाहन शर्मा (Nupur Sharma) यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.