राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यावर भाजप आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर कारवाईची मागणी विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे केली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाचा चोरमंडळ असा जर कोणीही उल्लेख केला असेल तर संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, असे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत. परंतु याच मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारा-यांनी गोंधळ घातल्याने विधिमंडळाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.
( हेही वाचा: विधीमंडळचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख; राज्य सरकार राऊतांविरोधात आणणार हक्कभंग? )
बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावं- अजित पवार
संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. परंतु, बोलत असताना प्रत्येकाने तारतम्य बाळगायला हवे. कोणत्याही व्यक्तीने काहीही बोलून चालणार आहे. विधीमंडळाचा उल्लेख जर कोणीही म्हणजे ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो जर असे वक्तव्य करत असेल तर त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जावी, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच, प्रत्येकाने नियम, शिस्त पाळायला हवी असेही पवार यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community