“गोव्यात स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त भाजपमध्येच…”

163

कोणताही विकास करण्यासाठी स्थिर सरकारची आवश्यकता असते ते देण्याची ताकद भाजपमध्ये आहे. म्हणून या विश्वासानेच गोवेकरांनी भाजपला निवडून द्यावे. डिचोलीचा विकास हवा असेल तर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद भाजपला मिळाला पाहिजे. म्हणून भाजपचे डिचोली विधानसभेचे उमेदवार राजेश पाटणेकर यांना निवडून द्या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. प्रविण दरेकर गोव्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डिचोलीचे उमेदवार राजेश पटणेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत दरेकर बोलत होते.

गोव्यामध्ये एक विश्वासाचे वातावरण

ते पुढे म्हणाले की, गोव्याच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शहा मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. ज्या ठिकाणी अमितभाई शाह जातात त्या ठिकाणी विजय निश्चित असतो. गोव्याची निवडणूक गोव्यासाठी महत्वाची आहे. डॉ प्रमोद सावंत यांनी गेल्या ५ वर्षात गोव्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमोद सावंत याना गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे गोव्यामध्ये एक विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

(हेही वाचा – नागपूरात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाल राडा! वाचा… )

… पण कोणाचा कोणाला मेळ नाही

भाजपचे सरकार असेल तर केंद्राकडून जास्तीचा निधी आणून इथला विकास, इथले प्रकल्प करता येतील. इतर पक्ष येत आहेत, घोषणा करत आहेत पण कोणाचा कोणाला मेळ नाही. भाजपचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाला गती मिळाली आहे. तुम्हाला जर डिचोलीचा विकास हवा असेल, तर राजेश पटणेकर यांना निवडून द्या, असे आवाहन दरेकर यांनी डिचोलीच्या मतदारांना केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेठ तनावडे, कर्नाटक राज्याचे मंत्री बसवराज, आमदार राहुल नार्वेकर व महेश जाधव आदी मान्यवरांसह यावेळी उपस्थित होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.