राज्यातील सहा राज्यसभा जागांपैकी शिवसेना (शिंदे) (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार गट) यांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असून भाजप आणि काँग्रेसमध्ये अद्याप अनिश्चितता आहे. भाजपमधून जर विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे नाव आघाडीवर असून त्यांना राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवण्यात आल्यास लोकसभेसाठी उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. (Vinod Tawde)
एप्रिलला कार्यकाळ संपणार
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातून शिवसेनेचे अनील देसाई (Anil Desai), भाजपचे प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar), नारायण राणे (Narayan Rane) आणि व्ही. मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर (Kumar Ketkar) आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या सहा खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत. (Vinod Tawde)
(हेही वाचा – AWES : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे उद्दिष्ट आणि दूरदॄष्टी)
देवरा, पार्थ पवार जवळपास निश्चित
काँग्रेसमधून नुकतेच आयात झालेले मिलिंद देवरा यांचे नाव शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निश्चित झाल्यासारखेच आहे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नाव आघाडीवर आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून २ लाखाहून अधिक मतांनी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून परभूत झाले होते. पुन्हा लोकसभेचा धोका न पत्करता राज्यसभा तुलनात्मक सुरक्षित असल्याचे समजते. या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला ४२ मतांची गरज असून शिवसेनेकडे ४० आमदार आणि अन्य अपक्ष तर राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत. (Vinod Tawde)
पंकजा राज्यसभेवर..
भाजपचे तीन खासदार निवृत्त होत असून बिहारचे प्रभारी विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया राहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, यापैकी एक मागे ठेऊन नारायण राणे यांचा पुन्हा राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो. भाजपचे सध्या १०४ आमदार संख्या असून प्रत्येकी ४२ प्रमाणे १२६ ची गरज भासेल. पंकजा यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची बहीण प्रीतम यांचा विचार विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात येणार असल्याचे समजते. काँग्रेसचे ४५ आमदार असून त्यांचा उमेदवार दिल्लीहून ठरवला जाईल, असे सांगण्यात आले. (Vinod Tawde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community