रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध आता भयंकर वळण घेण्याच्या मार्गावर आले आहे. या युद्धात उघडपणे अणु हल्ल्याच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. जर रशियाने युक्रेनवर अणू हल्ला केला तर काय करणार, या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘मग आम्हाला कुणाला विचारण्याची गरज भासणार नाही’, अशा कडक शब्दांत इशारा दिला आहे.
काय म्हणाले जो बायडेन?
रशियाच्या क्रिमिया ब्रिजवरील हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चांगलेच संतापले आहेत. युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी रशियाकडून जोरदार मिसाईल हल्ले चढवले जात आहेत. यात युक्रेनच्या कीव्ह आणि खारकिव्हमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला केला जात आहे. आता पुतीन लवकरच युक्रेनवर अणुहल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पुतीन यांनी युक्रेनवर अणुहल्ला केला तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असेल? असे सीएनएनच्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती जो बायडन यांना विचारण्यात आले. त्यावर ‘आम्हाला कुणाला विचारण्याचीही गरज भासणार नाही’, असे बायडन यांनी उत्तर दिले. पुतीन यांची भेट घेण्याचा माझा कोणताही इरादा सध्या नाही. पण जी-२० परिषदेत ते माझ्यासमोर आले आणि ग्रिनरच्या सुटकेबाबत त्यांनी माझ्याशी बोलण्याची तयारी दाखवली तर मी त्यांना भेटेन. पण तेही परिस्थितीवर अवलंबून आहे, असे जो बायडन म्हणाले. ग्रिनर हा अमेरिकेचा बास्केट बॉल खेळाडू आहे. त्याला रशियाने अटक केली असून ९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
(हेही वाचा गुरुंचे निधन झाल्याचे कळूनही निखिल लढला हिंमतीने, बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले)
Join Our WhatsApp Community