विरोधी पक्षाकडून देण्यात आली होती पंतप्रधान पदाची ऑफर; Nitin Gadkari यांचा गौप्यस्फोट

102
तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ; Nitin Gadkari यांचा मोठा दावा
तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ; Nitin Gadkari यांचा मोठा दावा

पंतप्रधान पदावरून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी एक मोठा खुलासा केला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान एका विरोधी पक्षाकडून पंतप्रधान होण्यासाठीची ऑफर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari PM Offer) देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला. मात्र, त्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर नाकारली असल्याचे सांगितलं. 

नागपुरातील पत्रकारिता पुरस्कारादरम्यान त्या घटनेचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, मी कोणाचेही नाव घेणार नाही, पण ज्या नेत्याने मला ही ऑफर दिली होती, त्या नेत्याने तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे सांगितले होते. मी विरोधी पक्षातील त्या नेत्याला विचारले की, तुला मला साथ का द्यायची आहे आणि मी तुझा आधार का घेऊ? पंतप्रधान बनणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. असे विधान नितीन गडकरी यांनी केले. 

(हेही वाचा – Jharkhand BJP : झारखंड निवडणुकीपूर्वी ‘या’ अपक्ष आमदाराचा भाजपामध्ये प्रवेश )

मी माझ्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे

मी माझ्या विचारधारेशी आणि संघटनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. मी त्या पक्षात आहे ज्याने मला स्वप्नातही वाटले नव्हते असे सर्व काही दिले आहे. कोणतीही ऑफर मला मोहात पाडू शकत नाही. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही कारण मी दृढ विश्वासाची व्यक्ती आहे. यावेळी गडकरींनी पत्रकारिता आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले.

गडकरींनी नैतिकतेवर विशेष भर दिला

प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, असेही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले. न्यायव्यवस्था, कार्यपालिका, विधिमंडळ आणि प्रसारमाध्यमे हे चारही स्तंभ नैतिकतेचे पालन करतात तेव्हाच लोकशाही यशस्वी होऊ शकते. या समारंभात गडकरी यांनी चार ज्येष्ठ पत्रकारांना 2023-24 साठी पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी अनिलकुमार पुरस्कार देऊन सन्मानित केले. (Nitin Gadkari)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.