Ambernath : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ३० मार्च रोजी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात (Gudi Padwa Melava 2025) मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही बाब तपासून पाहा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. ज्यानंतर आता मनसैनिक कामाला लागले आहेत. दरम्यान ठाण्या पाठोपाठ अंबरनाथ मधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँकेवर मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी धडक मारली. (Ambernath)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या आदेशाचे पालन मनसेसैनिक मंगळवारपासून करताना दिसत आहेत. सुरुवातीला ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली. त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध जिल्ह्यांतील स्थानिक पदाधिकारी बँकांमध्ये जाऊन त्यासंबंधीची पाहणी करत आहेत. पण काही ठिकाणी बँक मॅनेजर अमराठी असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे त्यांचा त्यांच्याशी वाद होत आहे. अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतही बुधवारी असाच प्रकार घडला.
आप ये पुना जा के बोलो
यासंबंधीच्या माहितीनुसार, अंबरनाथचे मनसे (Ambernath MNS) शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे आपल्या कार्यकर्त्यांसह बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गेले. तिथे त्यांची गाठ शर्मा नामक अमराठी मॅनेजरशी पडली. त्याने आपल्याला मराठी येत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यावर मनसैनिकांनी मराठी येत नसेल तर तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन काम करा असे ठणकावून सांगितले. त्यावर शर्मा यांनी हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा असे प्रत्युत्तर दिले. त्यांचे हे उत्तर ऐकूण मनसेचे पदाधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी या बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
(हेही वाचा – Malnutrition : मुंबईतही कुपोषणाचा प्रश्न कायम; एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा अहवाल काय सांगतो; वाचा )
दुसरीकडे, मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील बँकांमध्ये जावून मराठी भाषेचा आग्रह धरला होता. तत्पूर्वी, पालघर येथील मनसे कार्यकर्त्यांनीही राष्ट्रीयीकृत बँकांत जावून यासंबंधीची पाहणी केली होती. त्यात या बँकांमध्ये सर्रासपणे हिंदी भाषा बोलली जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community