#TheKashmirFiles: “… हा कोणता ‘राष्ट्र’वाद?”, हिंदू जनजागृती समितीचा सवाल

174

देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. दरम्यान, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याच्या संदर्भात विधीमंडळात निवेदन करतांना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेले वक्तव्य हिंदू व्यक्तींप्रतीची असंवेदनशीलता व्यक्त करणारे आहे.

हे गृहमंत्री असणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही

देशभरात प्रचंड प्रमाणात गाजत असलेला द काश्मीर फाईल्स हा चित्रपट वर्ष 1990 मधील काश्मिरी हिंदुंच्या विस्थापनाविषयी आहे कि वर्ष 1947 च्या भारताच्या फाळणीविषयी, हेच राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नसणे, हे दुर्दैवी आहे. वर्ष 1947 मधील फाळणीच्या वेळी झालेल्या पाकिस्तानातील शीख आणि हिंदू यांच्या विस्थापनालाही त्यांनी ‘इकडून तिकडून येणे-जाणे झाले’, असे सहज म्हणणे, हे गृहमंत्री असणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही.

(हेही वाचा -‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)

राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कोणता ‘राष्ट्र’वाद?

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुरुंगात असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जुलै 2020 मध्ये ‘मुहंमद : द मेसेंजर ऑफ गॉड’ या इराणी चित्रपटावर दंगेखोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रझा अकादमीच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात बंदी घातली होती. एका संघटनेच्या मागणीवरून चित्रपट न पहाताच ‘मुहंमद’ या चित्रपटावर तत्परतेने बंदी घालणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहखाते काश्मिरी हिंदू व्यक्तींवर पाकिस्तान पुरस्कृत आतांकवाद्यांनी केलेल्या अत्याचारांचे, तसेच हिंदू समाजाच्या वंशसंहाराचे सत्य मांडणारा द कश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कोणता ‘राष्ट्र’वाद आहे, हा प्रश्न निर्माण होतो, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.