जम्मू-काश्मीरः हिंदुंना डावलून होणा-या बैठकीचा इक्कज्जूट जम्मूकडून निषेध!

हिंदुंच्या हक्कांसाठी लढणा-या इक्कज्जूट जम्मूला सुद्धा या बैठकीपासून डावलण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर मधील राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजकारणात ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. पण या बैठकीवरुन आता नवा वाद समोर आला आहे. या बैठकीत अलगावादी आणि गुपकार संघटनांना प्राथमिकता देण्यात आली आहे, पण जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारात आपलं सर्वस्व गमवावं लागलेल्या पंडित आणि हिंदुंच्या पदरी निराशाच पडली आहे.

जम्मूतील डोगरा समाज, पंडित आणि हिंदुंचे अस्तित्त्व केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत नाकारण्यात आले आहे. या भेदभावामुळे जम्मूतील हिंदू वर्ग नाराज आहे. म्हणूनच याच्या निषेधार्थ इक्कज्जूट जम्मू तर्फे गुरुवार 24 जून रोजी सकाळी 10 वाजता राज्यात काळा दिवस साजरा केला जाणार आहे.

हिंदुंशिवाय चर्चा कशी?

जम्मू-काश्मीरमधील हिंदू समाजात पंडित, डोगरा समाज, शीख, जैन या सर्वांचा समावेश आहे. परंतु केंद्र सरकारने डोगरा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक लाल सिंह यांना या बैठकीसाठी बोलावले नाही. तसेच हिंदुंच्या हक्कांसाठी लढणा-या इक्कज्जूट जम्मूला सुद्धा या बैठकीपासून डावलण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर मध्ये हिंदुंची हत्या, बलात्कार आणि आतंकवादी कारवायांच्या विरुद्ध आवाज उठवत आजवर भाजपने आपला प्रचार केला आहे. परंतु कलम 370 आणि 35ए रद्द झाल्यानंतर त्यांनी आपली ही भूमिका बदलली आहे. पंतप्रधानांच्या बैठकीसाठी आमंत्रित केलेल्या नेत्यांच्या यादीवरुन हा आरोप करण्यात येत आहे.

काळा दिवस

जम्मूसोबत करण्यात आलेल्या या भेदभावाबाबत इक्कज्जूट जम्मकडून राज्यात 24 जून रोजी काळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येणार असून, त्याचा इतर कोणालाही त्रास होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here