विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होऊ लागली आहे. या ठिकाणी सिराज या मुसलमान तरुणाने १२ हिंदू तरुणांना खोटे सांगून् त्यांच्या नावाने बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपयांची उलाढाल केली. याविषयी त्या खातेदार हिंदू तरुणांना काहीही माहिती नव्हती, त्या तरुणांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मालेगाव येथील मुसलमानांनी एक गठ्ठा मते भाजपाच्या विरोधात टाकल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. हा भाजपाच्या विरोधात Vote Jihad झाला, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. आता विधानसभा निवडणुकीसाठी Vote Jihad करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचे व्यवहार झाले आहेत. या प्रकरणी सक्षम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासाठी जय १२ हिंदू तरुणांच्या नावाने खाती उघडण्यात आली होती, त्यातील एक जयेश मिसाळ यांनी तक्रार केली.
अशी केली फसवणूक
एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे, सिराज अहमद मोहम्मद हारुन मेमन याने त्याच्या भावाला कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगाव येथे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा आहे. त्याकरिता मला तुझ्या नावाचे बँक खाते उघडून दे त्यावर शेतकरी यांना द्यावयाचे पैसे तुझ्या नावावर ट्रान्सफर करतो तसेच त्याबदल्यात तुला कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावमध्ये कामाला लावून देतो, असे सांगितले. त्यानंतर सिराजने भावाला आणखी 10 ते 12 बँक खाती उघडायची असल्याने तुझ्या परिचयाचे लोकांचे आधारकार्ड व पॅनकार्ड, सिमकार्ड आणून दे, त्यांना देखील मी कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावमध्ये कामाला लावून देतो असे सांगितले. त्यानुसार 1) राहुल गोविंद काळे, २) मनोज गोरख मिसाळ, 3) प्रतिक पोपट जाधव, ४) पवन पोपट जाधव, ५) ललित नानाजी मोरे, 6) राजेंद्र नंदकुमार गिरी, 7) धनराज देविदास बच्छाव, ८) भावेश कैलास घुमरे, ९) दिवाकर कैलास घुमरे, ११) दतात्र्यय कैलास यांच्या नावाने खाती उघडली. त्यानंतर 12 लोकांपैकी दत्तात्रय उशिरे याने त्याचे बँक खाते चेक केले असता त्यात खुप मोठ्या प्रमाणात व्यवहात झाल्याचे त्याच्या लक्षात आले, त्यानंतर आम्ही सर्वजण नाशिक मर्चड को ऑप बँक मालेगाव येथे गेलो तेथील अधिकारी व कर्मचारी यांना भेटलो त्यांनी आमचे काहीही म्हणणे ऐकून घेतले नाही. आमचा तक्रार अर्जही स्विकारला नाही.
माझ्या अकाउंट क्रमांक 0230100000197 यावरुन चौदा कोटी दोन हजार सहासे एकसष्ठ रुपयाचा व्यवहार झाल्याचे दिसले, तसेच माझ्या नावावर दोन कोटी रुपयाची एफडी करुन त्या बदल्यात एक कोटी नव्वद लाख रुपये कर्ज घेतल्याचे निर्दशनास आले वास्तविक मी बँकेत खाते उघडल्यावर एकदाही गेलो नाही तरी माझ्या नावे आरटीजीएस, एफडी कर्ज प्रकरण केल्याचे लक्षात आले तेव्हा माझी खात्री झाली की सिराज बँकेचे कर्मचारी यांनी संगनमत करुन माझ्या नावाच्या बनावट पावत्या कर्ज प्रकरण बनवून खोट्या सह्या करुन बनावट कागदपत्र बनवून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन माझी फसवणूक केली आहे तसेच इतर 11 लोकांसोबतही अशाच प्रकारे आजपावेतो अंदाजे 80 ते 90 कोटी रुपयाचे व्यवहार आमच्या खात्यावर झाले आहे. सदरच्या रक्कमा कोणी टाकल्या व आमच्या खात्यावरुन परस्पर कोणाच्या खात्यावर वर्ग केल्या याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. तसेच एवढी रक्कम नेमक्या कोणत्या प्रयोजनासाठी वापरली किंवा तिचा काही दुरुपयोग किंवा विघातक कांमासाठी झाला नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे. सिराज व त्याचे साथीदार बँक अधिकारी व कर्मचारी यांनी संगमत करुन १२ जणांच्या नावाने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन आमची फसवणूक केली आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. यावर भाजपाचे नेते डॉ. किरीट सोमेय्या यांनी हा प्रकार Vote Jihad चाच आहे. असा आरोप केला, मालेगावतील हिंदूंना नोकरीची आमिष दाखवून त्यांच्या नावे बनावट बँक खाती उघडण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी सिराज फरार आहे. Vote Jihad
Join Our WhatsApp Community