म्हाडाच्या जागेवर मंत्री अनिल परबांचे बेकायदेशीर बांधकाम! किरीट सोमय्यांची तक्रार 

ठाकरे सरकारच्या दबावामुळे म्हाडा प्रशासनाने त्या अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

103

‘मातोश्री’पासून अवघ्या अर्ध्या कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीनगर, वांद्रे स्थित इमारत क्र. ५७ व ५८ मधील म्हाडाच्या मोकळ्या जागेवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कब्जा करून २००० स्के.फी. चे बेकायदेशीर बांधकाम करून त्यामध्ये त्यांचे कार्यालय सुरु आहे, असा आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला.

अनधिकृत बांधकामाला राजकीय वरदहस्त! 

म्हाडाने २७ जून २०१९ रोजी मंत्री अनिल परब यांना नोटीस देऊन हे बांधकाम बेकायदेशीर असून ते त्यांनी नोटीस प्राप्त झालेल्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम काढून टाकावे आणि तसा अहवाल कार्यालयाला सादर करावा, असा आदेश दिला होता. म्हाडाने आदेश देऊन सुद्धा मंत्री परब यांनी अनधिकृत बांधकाम पाडले नाही व त्यावर म्हाडाने कोणतीही कार्यवाही केली नाही. यावर भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. परंतु, ठाकरे सरकारच्या दबावामुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : विद्यार्थ्यांची फरफट, शिक्षकांना लागली घरघर! राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा!)

लोकायुक्तांकडे केली तक्रार!

भाजपा नेते डॉ. सोमैया यांनी लोकायुक्तांकडे मंत्री अनिल परब, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा, कार्यकारी अभियंता म्हाडा, मालमत्ता व्यवस्थापक (Estate Manager) म्हाडा, निर्मल नगर पोलिस स्टेशन यांच्या विरोधात मार्च २०२१ ला प्र.क्र. लोआ/कॉम/११३७/२०२१ (टे-१) ची जनहित याचिका दाखल केली. या डॉ. सोमैया यांच्या याचिकेवर १३ जुलै २०२१ रोजी १२ वाजता माननीय प्रभारी लोक आयुक्त यांच्या समोर महाराष्ट्राचे प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग मंत्रालय, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा यांच्या समवेत सुनावणी होणार आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.