परप्रांतीय फेरीवाले मनसेच्या रडारवर! राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट

राज ठाकरे यांनी जे आदेश दिले आहेत त्याचे तंतोतंत ठाण्यात पालन होईल, असे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

94

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्याने ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता राणे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात त्यांची दोन बोटे तुटली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली. त्यांनी थेट संबंधित फेरीवाल्याला मारण्याची धमकी दिली. आता राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात पोहचले. त्यावेळी मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव हे उपस्थित होते.

ठाण्यात महापालिकेची कारवाई अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात होती, मनसेचीही भूमिकाही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातच आहे. या प्रकरणी आपण कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पोलिस त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील, तसेच न्यायालयाचे कर्तव्य बजावेल, अशी आशा आहे. पण यात काळ सोकावत आहे.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर फेरीवाल्यांचा मुद्दा पेटणार! 

राज ठाकरे यांनी यासंबंधी भूमिका मांडताना परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून ती ठेचली पाहिजे. हल्ला करणारा तो फेरीवाला पोलिसांच्या ताब्यातून बाहेर पडल्यावर मनसे त्याला भीती काय असते ती दाखवून देणार आहे, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा त्यांचा जुना मराठी आणि परप्रांतीय असा मुद्दा बाहेर काढला आहे का, अशी चर्चा उपस्थित झाली आहे. दरम्यान राज ठाकरे हे बुधवारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेण्यासाठी ठाणे येथे रवाना झाले. राज ठाकरे यानिमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांना हिम्मत देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्याच बरोबर मुजोर फेरीवाल्यांना जरब बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे हे फेरीवाल्यांचा मुद्दा आक्रमकपणे मांडणार आहे. या माध्यमातून ते परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा तापवणार आहे. मुंबई, ठाणे सह महामुंबईत परिसरातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये फेरीवाल्यांचा मुद्दा पेटणार आहे.

(हेही वाचा : मनसेकडून मुख्यमंत्र्यांना कमिशनर रँडची उपमा!)

राज ठाकरेंच्या आदेशाचे तंतोतंत पालन होणार! – मनसे नेते 

राज ठाकरे यांनी जे आदेश दिले आहेत त्याचे तंतोतंत ठाण्यात पालन होईल, असे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित फेरीवाल्याचा मनसे चांगलाच समाचार घेणार आहे, असे संकेत दिले आहे. तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ‘या प्रकरणी राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे, पुढे बघा काय होईल.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.