सध्या गुजरातमध्ये निवडणूक सुरु आहे. ५ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्याआधीच अहमदाबादच्या जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना एकजूट राहून भाजपाला मतदान न करता काँग्रेसला करण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले इमाम?
इमाम शब्बीर म्हणाले की, मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे २०१२ साली अहमदाबादमधील जमालपुरा हा विधानसभा मतदार संघ भाजपने काबीज केला होता. इमाम यांच्या मते, मुस्लिम मतांचे आपापसात विभाजन हे त्याचे कारण होते. मुस्लिमांनी त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला जिंकवावे. 2012 मध्ये काँग्रेस पक्षाने जमालपुरा मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार उभा केला होता. त्यांच्या विरोधात स्थानिक नेते साबीर काबलीवाला यांनीही निवडणूक लढवली होती. काबलीवाला यांना सुमारे ३० हजार मते मिळाली. या चुरशीत भाजपचा उमेदवार ६ हजार मतांनी विजयी झाला होता. त्याच जमालपुरा मतदारसंघातून पुन्हा एकदा काबलीवाला निवडणूक लढवत आहेत. यावेळी ते ओवेसी यांच्या पक्ष AIMIM चे उमेदवार आहेत.
(हेही वाचा मविआच्या काळात कौशल्य विकास केंद्राची जमीन ‘उर्दू लर्निंग सेंटर’ला आंदण)
काँग्रेसशी वैर न बाळगण्याचे आवाहन
गुजरात निवडणुकीत ओवेसींच्या पक्ष प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत इमाम शब्बीर यांनी विचारले की, विधानसभेत ते काय करणार आहेत? शाही इमाम यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांचे भाजपशी वैर आहे, त्यामुळे अशा वेळी त्यांनी काँग्रेसशीही वैर बाळगू नये. मुस्लिमांना संघटित होऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन इमाम यांनी उघडपणे केले. इमाम यांच्या या वक्तव्यावर भाजपचे उमेदवार भूषण अशोक मित्तल यांनी संवाद साधला. मुस्लिमांना समजले आहे की, काँग्रेस त्यांचा व्होट बँक म्हणून वापर करत आहे. भाजप उमेदवार पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत काँग्रेसकडे आपली व्होट बँक वाचवण्यासाठी मर्यादित पर्याय उरले आहेत.
Join Our WhatsApp Community