काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांचे पुत्र युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी २ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आवारात वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा पुतळा जाळला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विद्यापीठात आंदोलन करून राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी प्र-कुलगुरू यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात संपर्क करून तक्रार नोंदवली. पण त्याला ५ दिवस झाले तरी गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी थेट कुलगुरूंनाच घेराव घातला आहे.
वीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन
यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना सभागृहात बसवून त्यांच्या भोवती ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत कुणाल राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. कुणाल राऊत हे कुलगुरूंना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेले होते, त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा पुतळा जाळला. अशा प्रकारे विद्यापीठाने वीर सावरकर यांचा पुतळा जाळायला परवानगी दिलीच कशी, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या आधी विद्यार्थ्यांनी जेव्हा याच कारणासाठी प्र कुलगुरू यांच्या समोर आंदोलन केले होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी वीर सावरकरांचा पुतळा जाळण्यात आला, तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) प्रतिमेचे पूजन करून कुणाल राऊत यांच निषेध व्यक्त केला होता आणि प्र-कुलगुरूंना सावरकरांची प्रतिमा भेट दिली होती.
Join Our WhatsApp Community