महाराष्ट्र विधानसभेकडून संजय राऊतांविरोधात आलेले हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी वरिष्ठ सभागृहाच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवले आहे. त्यामुळे विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणाऱ्या राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी,’विधानमंडळ नव्हे तर चोरमंडळ’ अशी टीका केल्यानंतर, त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौकशी समितीही नेमली होती. पुढे हक्कभंगाच्या नोटिशीवर राऊत यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे कारण देत विधानसभा सचिवालयाने हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतीकडे पाठवले होते. राऊतांविरोधात हक्कभंगाच्या प्रकरणाची विशेषाधिकार समितीकडून चौकशी केली जावी, असे पत्र सचिवालयाने ६ एप्रिल रोजी पाठवले होते.
(हेही वाचा – मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; कायदा मंत्रालयाचा कारभार किरेन रिजिजू यांच्याकडून काढून घेतला)
त्यावर सभापती धनखड यांनी निर्णय घेत हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले. उपसभापती हरिवंश यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती या प्रकरणाची चौकशी करेल. धनखड यांनी या समितीकडे पाठवलेले हे दुसरे प्रकरण असून, कॉंग्रेस खासदार रजनी पाटील यांच्या निलंबनाचे प्रकरणही प्रलंबित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community