Uniform Civil Code Act : राम मंदिरानंतर समान नागरी संहिता कायद्याची अंमलबजावणी

अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचा अभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार समान नागरी संहिता कायदा (सीएए) लागू करण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे.

326
Uniform Civil Code Act : राम मंदिरानंतर समान नागरी संहिता कायद्याची अंमलबजावणी
Uniform Civil Code Act : राम मंदिरानंतर समान नागरी संहिता कायद्याची अंमलबजावणी

‘अब की बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’चा नारा देऊन भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचा अभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार समान नागरी संहिता कायदा (UCC) लागू करण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे. (Uniform Civil Code Act)

भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) खास नारा तयार केला आहे. तो नारा आहे ”अब की बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’. महत्वाचे म्हणजे हा नारा फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेला नाही तर यामागे मोठी रणनिती आहे. ४०० जागांचा आकडा खरंच गाठला जाऊ शकतो काय? आणि हा आकडा गाठणे कसे शक्य होईल? याचा चौफेर विचार केल्यानंतरच भाजपने (BJP) हा नारा दिला आहे. (Uniform Civil Code Act)

भाजपला (BJP) मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा चेहरा आणि सामुहिक नेतृत्वात निवडणूक लढण्याचा निर्णय अचूक ठरला आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाचा आत्मविश्वास बळावला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत योजनाबध्द पध्दतीने आणखी थोडी मेहनत केली तर यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात याची भाजपला (BJP) खात्री आहे. (Uniform Civil Code Act)

(हेही वाचा – Panvel-Karjat Rail Line : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर; न्यायालयाने केला हस्तक्षेप)

कायद्याची भर पडल्यास ४०० जागांचा आकडा गाठता येणार 

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. संपूर्ण देशात याचा उत्साह दिसून येत आहे. याचा लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला चांगला फायदा होणार आहे. यात समान नागरी संहिता कायद्याची (Uniform Civil Code Act) भर पडली तर ४०० जागांचा आकडा सहज गाठला जाऊ शकतो, असा निष्कर्ष भाजपच्या चाणक्यांनी अभ्यासाअंती काढला आहे. यामुळे अयोध्येतील सोहळा संपल्यानंतर मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार (Central Govt) समान नागरी संहिता विधेयक संसदेत आणणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच हा कायदा लागू केला जाऊ शकतो, असे मत सूत्राने व्यक्त केले आहे. (Uniform Civil Code Act)

युसीसी कायद्यानुसार (UCC Act) ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेले गैर-मुस्लिम स्थलांतरित (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) यांना भारतीय नागरिकत्व देण्यााची तरतूद आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांच्या बैठकीत युसीसी कायदा (UCC Act) लागू करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि हा कायदा लागू करण्णे भाजपची वचनबद्धता आहे असे म्हटले होते. (Uniform Civil Code Act)

(हेही वाचा – Raju Shetti : ‘स्वाभिमानी’ राजू शेट्टींची महाविकास आघाडीशी कट्टी कायम)

पात्र व्यक्तींना भारतात प्रवेश आणि नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार 

संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये युसीसी कायदा (UCC Act) मंजूर झाला होता. संसदेने हा कायदा मंजूर केल्यानंतर दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने झाली होती. दरम्यान, युसीसी (UCC Act) हा कायदा लागू करण्यासाठी लवकरच नियमावली बनविली जाणार आहे. यानंतर पात्र व्यक्तींना भारतात प्रवेश करता येईल आणि नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल. लोकसभा निवडणुकीची घोषणा एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे. (Uniform Civil Code Act)

नागरिकत्वाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल आधीच बनविण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने उपयोगात आणली जाणार आहे. अर्जदारांना भारतात कोणत्या वर्षी प्रवेश केला हे सांगावे लागणार आहे. ही अट त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कोणत्याही कादगपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला होता. याशिवाय त्यांना अन्य कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता पडणार नाही. (Uniform Civil Code Act)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.