नवरात्रोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून महिलांसाठी एक खास अभियान राबवले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.
सोमवारपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान, चालणा-या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरुक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक तपासणी करुन घ्यावी, अशी विनंती आपल्याला करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे विशेष अभियान राबवण्यास सुरुवात होत आहे.#नवरात्रोत्सव #नवरात्रोत्सव_२०२२ #आई #माता pic.twitter.com/w6UzAoZ2wd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 26, 2022
( हेही वाचा: नवरात्रीनिमित्त बेस्टची मुंबईकरांसाठी खास ऑफर; 19 रुपयांत करू शकता 10 बसफेऱ्या; असा घ्या लाभ )
महिलांनी लाभ घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षांवरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे नवीन बॅंक खाते उघडणे, गरोदर मातांचे आधार कार्ड जोडणे यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community