दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गृहमंत्री Amit Shah यांची महत्त्वाची बैठक; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

35
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गृहमंत्री Amit Shah यांची महत्त्वाची बैठक; अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश
  • प्रतिनिधी 

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर महत्त्वाची बैठक शुक्रवारी घेतली. या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या. यावेळी गृहमंत्री शाह (Amit Shah) यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले असल्याचे समजते. मुख्यमंत्री यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या सरकारनंतर केंद्रीय गृहमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयाच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांच्यासह दिल्ली पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने महिला सुरक्षा आणि बांगलादेशी घुसखोरांवर चर्चा करण्यात आली.

(हेही वाचा – दिल्लीमध्ये लवकरच Ayushman Bharat Yojana)

या बैठकीचा उद्देश काय आहे?

शीला दीक्षित यांच्या सरकारनंतर केंद्रीय गृहमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयाच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीचा मुख्य उद्देश दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांमध्ये चांगले समन्वय निर्माण करणे आहे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निर्णय घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. याशिवाय, दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारता येईल या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा केली गेली. जेणेकरून येथील लोकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्यांच्या मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांना बोलावून दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता.

(हेही वाचा – Delhi मध्ये १४ रुग्णालयात आयसीयू नाही; कॅग अहवालाने केला आरोग्य सेवेचा भांडाफोड)

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

यासोबतच, त्यांनी मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की, दिल्लीतील गुन्हेगारीबाबत आपल्याला शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करावे लागेल. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही. दिल्लीत प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटले पाहिजे. ही प्रत्येक पोलिसांची वैयक्तिक जबाबदारी असली पाहिजे. दिल्लीतील निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. (Amit Shah)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.