पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टशी संबंधित १९० दशलक्ष पौंड घोटाळ्यात पाकिस्तानी न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांची पत्नी बुशरा बीबी हिलाही या प्रकरणात दोषी ठरवून ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार पाहता न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टशी (Al Qadir University Trust) संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Imran Khan)
( हेही वाचा : भाजपा पाठोपाठ NCP Ajit Pawar Group चेही शिर्डीत अधिवेशन, काय चर्चा होणार ? )
पाकिस्तानच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना १४ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी हिलाही ७ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) हा गुन्हा नोंदवला होता. ७२ वर्षीय खान, ५० वर्षीय बुशरा बीबी आणि इतर ६ जणांनी मिळून १९० दशलक्ष पौंड (सुमारे ५० अब्ज पाकिस्तानी रुपये) राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप आहे.इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने या प्रकरणी डिसेंबर २०२३ मध्ये या प्रकरणी निकाल देण्यासाठी ६ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. मात्र, न्यायाधीशांची अनुपस्थिती आणि इतर कारणांमुळे हे प्रकरण लांबणीवर पडले. (Imran Khan)
अल-कादिर ट्रस्ट प्रकरण हा पाकिस्तानातील (Pakistan) सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासह एका प्रॉपर्टी व्यावसायिकाने सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.नॅशनल अकाउंटबिलिटी ब्यूरोने (National Accountability Bureau) डिसेंबर २०२३ मध्ये इम्रान खान आणि इतर सात जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पीटीआयचे माजी अधिकारी यांचा देखील समावेश आहे. या प्रकरणातील इतर आरोपी देशाबाहेर आहेत, त्यामुळे इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावरच खटला चालवला जात आहे. (Imran Khan)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community