चालू हिवाळी शिंदे-फडणवीस सरकारमधील ४ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, अशा वेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे महत्वाचे नेते सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर १२० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले जलील?
तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लँड कन्वर्जनच्या नावाखाली औरंगाबाद मध्ये ५२ प्लॉट रूपांतरीत केल्याचा आरोप केला आहे. बुधवारी, २८ डिसेंबर रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा वापर बदलण्यात आला आहे. आणि यातील सगळ्यात मोठा एजंट हा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलगा होता. त्यामुळे याबाबत एसआयटी स्थापन करून चौकशी केली तर सुभाष देसाई तुरुंगात असतील असा दावा जलील यांनी केला आहे. तसेच राज्यात आत्तापर्यंत ३२ हजार एकर जमीन गेल्या पंधरा वर्षात इंडस्ट्रियल कन्वर्जन झाल्या असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सुभाष देसाई तसेच तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांची देखील चौकशी करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community