दोन्ही काँग्रेसला पुढच्या निवडणुकीत धडा शिकवा! इम्तियाज जलील यांचे मुसलमानांना आवाहन

146
काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने मुसलमानांना रबर स्टॅम्प बनवले, कायम गृहीत धरले. निवडणुकीत मुस्लिम आरक्षणाच्या बाता मारल्या, आज सत्तेवर आले आहेत, तरी गप्प का आहेत?, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर एमआयएमने मुंबईत सभा आयोजित केली. त्यावेळी खासदार जलील बोलत होते.

मुस्लिम आरक्षणाच्या बाता मारल्या, सत्तेत आल्यावर गप्प का?

९३ हजार एकर वक्फ बोर्डाची जमीन कुठे गेली?, कुणी जमीन विकली?, वक्फ बोर्डाचा सदस्य झाल्यावर आपण तीन महिन्यांत ९ ठिकाणी गुन्हे दाखल केले. ‘आम्हाला निवडले नाही तर शिवसेना, भाजप येईल’, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी घाबरवायचे, पण आता त्यांना कळले ‘मुसलमान समजूतदार झाला आहे.’  मुसलमान गरीब आहे, असा अहवाल आला, तरी न्यायालयात का सिद्ध करू शकले नाही? तेव्हा भाजप-शिवसेनेशी आम्ही लढत होतो, त्या वेळी दोन्ही काँग्रेसवाले बरेच बोलत होते, आज ते सत्तेत आले आहेत, २ वर्षांत काहीच यावर बोलत नाही. आम्ही प्रतीक्षा केली, आता आम्ही जेव्हा तुम्हाला विचारायला येत आहोत, असे म्हटले तर पोलिसांना समोर करून विरोध करत आहात. ९३ हजार एकर जमीन आम्हाला द्या, आमच्यासाठी एक पैशाची तरदूर करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. नवाब मलिक, अबू असीम आणि नसीम खान असो, आमच्यामुळे तुम्ही तिथे गेलात आणि आता म्हणतात कोण ओवैसी? असो पुढच्या निवडणुकीत लक्षात ठेवा, असेही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
 ‘मुंबई….लो मैं आ गया’ 
ते समाजत होते सरकार त्यांचे आहे, आम्ही काहीही करू शकतो, मी समाजात होतो जनता माझी आहे, मी काहीही करू शकतो, मी इथे पोहचूच नये म्हणून त्यांनी सगळी ताकद लावली, मीही ताकद लावली  आणि इथे पोहचलो. म्हणून मी म्हणतो, ‘मुंबई….लो मैं आ गया’. हे तर गुरगुरणे होते, अजून डरकाळी फोडायची आहे. औरंगाबादमधून अडवण्यात आले, यात पोलिसांची काही भूमिका नव्हती, पण त्यांच्यावर कुणी दबाव टाकला, हे आम्हाला माहित आहे, असेही जलील म्हणाले.

लाव रे तो व्हिडिओ 

यावेळी व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षातील मुसलमान आणि अन्य आमदारांनी मुसलमानांच्या आरक्षणावर ज्या गोष्टी केल्या होत्या, ते दाखवून आताच्या त्यांच्या भूमिकेची पोलखोल केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.