Imtiaz Jaleel तिरंगा रॅली सोडून गेले; फोन बंद केला; शेकडो कार्यकर्ते भडकले; पूर्व द्रुतगती महामार्गच रोखला

एम.आय.एम. पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी संभाजी नगर ते मुंबई असे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

155
‘एम.आय.एम’ पक्षाचा नेता इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे आंदोलकांना सोडून गेल्यामुळे आंदोलनकर्ते इम्तियाज जलील यांच्यावर भडकले होते, “आम्ही दोन दिवसांपासून उपाशी तापाशी आहोत, ८०० किलोमीटर दुरून आलेलो आहोत. आमचा नेता इम्तीयाज जलिलला इथे बोलवा, तो फोन बंद करून कसा निघून गेला?” असा आरडाओरड करून आंदोलनकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखून धरला होता, अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून या आंदोलनकर्त्यांना पिटाळून लावले. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी १०० ते १५० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
एम.आय.एम. पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी संभाजी नगर ते मुंबई असे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जलील हे हजारो कार्यकर्त्यांसह सोमवारी मध्यरात्री ठाण्यात दाखल झाले होते. या तिरंगा रॅलीत जवळपास लहान-मोठे अशी दोन हजार वाहने होती, रॅली ठाण्यात दाखल झाली, त्या वेळी रॅलीचे एक टोक आनंदनगर टोलनाका कोपरी येथे तर दुसरे टोक तीन हात नाका नौपाडा येथे होते.

आंदोलनकर्त्यामध्ये संतापाचे वातावरण

इम्तीयाज जलिल (Imtiaz Jaleel) यांनी नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना जकात नाका, आनंद नगर येथे आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधून जिल्हाधिकारी आणि मुंबई अपर पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन निघून गेले, इम्तियाज जलील हे निघून गेल्याचे रॅलीत सामील असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना माहीतच नव्हते, त्यांना कळविण्यात देखील आले नसल्यामुळे कोपरी आनंदनगर टोल नाका येथे जमलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये संतापाचे वातावरण झाले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून संपूर्ण रस्ता अडवला.

१०० ते १५० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल 

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे आंदोलकांना सोडून गेल्यामुळे आंदोलनकर्ते इम्तियाज जलील यांच्यावर भडकले होते, “आम्ही दोन दिवसांपासून उपाशी तापाशी आहोत, ८०० किलोमीटर दुरून आलेलो आहोत. आमचा नेता इम्तीयाज जलिलला इथे बोलवा, तो फोन बंद करून कसा निघून गेला?” असा आरडाओरडा करून आंदोलनकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखून धरला होता, अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून या आंदोलनकर्त्यांना पिटाळून लावले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी १०० ते १५० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.